रोहा (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे पाले खुर्द येथे नवऱ्यानेच पत्नीवर सपासप वार करत खून केल्याची घटना घडली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे तर तालुक्यासह रायगड जिल्हा हादरला आहे.
रोहा तालुक्यात कोलाड विभागातील मौजे संभे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील मौजे पाले खुर्द येथे रविवारी ३डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चक्क पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना घडली सदरच्या घटनेने परीसर तसेच तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.घर बांधण्यावरील कर्जाचा वाद अखेर पत्नीच्या जीवावर बेतलाचे समोर आले आहे तर मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
या विषयाची सविस्तर माहिती अशी की मौजे पाले खुर्द येथील वैभव राम ठाकूर याने घर बांधकाम कर्ज वादातून पत्नी विद्या हिच्यावर कोयत्याने सपासप वार करत तीला जिवे ठार केले असल्याचे समोर आले आहे.तर घडलेल्या या घटनेमुळे सबंध परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देत आरोपीस ताब्यात घेतले कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे कोलाड येथील वैभव राम ठाकूर (३७) यांनी त्यांची पत्नी विद्या वैभय ठाकूर (३३) हिच्याशी घर कामाच्या बांधकामाच्या कर्जाचा वादातून त्याच्यावर कोयत्याचे वार करत तिच्या कानावर तसेच डोक्यावर जोरदार वार करून तिला जिवे ठार केले आहे.
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील आरोपीत याने घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज फेडण्यावरुन त्यांची पत्नी हिस सोबत वाद झाल्याने त्या रागाने आरोपीत याने लोखंडी कोयत्याने पत्नीचे उजव्या कानावर व त्याच ठिकाणी डोक्यामध्ये वार करुन ठार केले व सदर ठिकाणी फिर्यादी हे काय झाले हे पाहण्याकरीता गेले असता आरोपीत हे फिर्यादी यांचे अंगावर धावुन येवुन त्यास शिवीगाळी करुन आतमध्ये आलास तर तुला सुध्दा कोयत्याने ठार मारेन अशी धमकी दिली म्हणुन ११६/२०२३, भा. दं. वि. सं . कलम ३०२,५०४, ५०६ प्रमाणे नोंद झाली आहे तसेच कोलाड पोलिस निरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई साळुंखे अधिक तपास करत आहेत.