गुहागरमध्ये 27 पासून शृंगारतळी फेस्टिवल, कोकण इन्व्हेंंटसचा स्तुत्य उपक्रम

Share Now

1,259 Views

गुहागर प्रतिनिधी- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येतील हौशी तरुण आणि कोकण इन्व्हेटसच्या माध्यमातून शृंगारतळी येते दिनांक 27 28 29 या कालावधीत शृंगार तरी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खाद्यपदार्थाचे स्टॉल करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.
  कोकणातील केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या गुहागर तालुक्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात समुद्र चौपाटी बरोबर ऐतिहासिक व धार्मिक स्थळे पर्यटकांना पाहावयास मिळतात त्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही करमणुकीचे साधन तालुक्यात नाही आलेल्या पर्यटकांची करमणूक व्हावी आणि एका दिवसासाठी आलेला पर्यटक आणखी चार दिवस गुहागर तालुक्यात राहावा म्हणून शृंगारतळी येथील व्यावसायिक इद्रीस साल्हे ,एजाज मालाणी,ताहिर साल्हे,मसुद मालगुंडकर,कैसर बोट,मज्जीद शेख,साकेत पेवेकर,डॉ. जरार साल्हे यांनी हा पुढाकार घेऊन शृंगारतळी जानवळे फाट्या समोरील गोल्डन पार्क येथे ते सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शृंगारतळी फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे .
या फेस्टिव्हलमध्ये हे लहान मुलांसाठी करमणुकीचे गेम्स, स्थानिक लोककला, प्रश्न उत्तरे स्पर्धा, गाण्याचा कार्यक्रम ,लकी ड्रॉ विविध खाद्यपदार्थ व बचत गटांचे मिळून सुमारे 70 स्टॉल उभारले जाणार आहेत. तसेच गुहागर किंग व क्वीन सौंदर्य स्पर्धा होणार आहे यातील विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे .
.तालुक्याच्या पर्यटनाला चालना देणे येथील व्यावसायिक व बचत गटांना त्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळवून देणे आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शृंगार तरी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोकणे इव्हेंटसचे चे ईदि्स साल्हे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *