बापरे, बेकायदेशीर शस्त्र साठ्याचा संग्रहच ? भली मोठी यादी , गुन्हे अन्वेषणाच्या धाडीत सापडला शस्त्रसाठा, एकच खळबळ

Share Now

1,509 Views

रोहा (प्रतिनिधी) सोमवारी रात्रौ अलिबाग गुन्हे अन्वेषण शाखेने पकडलेल्या धाडीत बेकायदेशीर शस्त्र साठ्याचा संग्रहच सापडल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. रोहा शहरातील धनगर आळीतील तन्मय भोकटे याच्या घरात हा अवैध शस्त्रसाठा आढळून आला. बापरे, केवढा हा शस्त्रसाठा, जणूकाही संग्रहच केला होता की काय ? हा प्रश्न पडावा, एवढी मोठी शस्त्रसाठ्याची यादी समोर आली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग विभागाचे पोलीस निरीक्षक खाडे, पोलीस उपनिरीक्षक साठे, चव्हाण यांच्या पथकाने ही धाड टाकली. रात्रो १० वाजता टाकलेल्या धाडीत बेकायदेशीर वर्णनाचा शस्त्रसाठा बाळगल्या स्थितीत सापडला, तशी फिर्याद पोलीस नाईक विशाल आवळे यांनी केली. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी आरोपी तन्मय सतिश भोकटे वय २४ वर्षे राहणार धनगरआळी याला रात्रो अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली. दरम्यान, रोहा शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्याचा संग्रहच आढळून आल्याने सबंधीत आरोपीचा नेमका उद्देश काय ? याबाबत अधिक तपास सुरू आहे तर तरुण असलेला आरोपी सर्व प्रकारचा शस्त्रसाठा, दुर्मिळ जनावरांचे शिंग संग्रह साठा करतो, यामागील नेमकी मानसिकता काय ? हे अधोरेखीत होणे गरजेचे आहे.

रोहा शहरात सोमवारी रात्रौ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याची घटना घडली. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाने धनगरआळीत राहणारा तन्मय भोकटे याच्या घरी अचानक धाड टाकली. गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, रोहा पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या धाडीत खालील वर्णनाचे शस्त्रसाठा, दुर्मिळ प्राण्यांचे संग्रही अवशेष शिंगे आढळून आली. २० हजार रुपये किमतीचे लाकडी बट असलेली लोखंडी बॅरलची बाराबोर बंदूक अशा तीन बंदूक आढळून आल्या, ठासणीची बंदूक, लाकडी मूठ असलेली रिवॉल्वर, डबल बार बॅरल बंदूक, ठासणीची लोखंडी बॅरल बंदूक, १० ठासणीची लोखंडी चाप, बंदुकीचे काळ्या रंगाचे रबरी बट, २५ बारेबार बंदुकीचे जिवंत काडतुसे, १० जिवंत राऊंड व्हीआयआय लिहिलेले ४ जिवंत राऊंड, ७ बारोबार बंदुकीचे काडतुसाचे खाली केस, ६ तांब्याचे डमी राऊंड, स्टेनलेस स्टीलचा बॅरल पाईप, ठासणीची लोखंडी रॅमराॅड, पितळी मूठ असलेल्या ३ लोखंडी तलवारी, लाकडी मूठ असलेल्या ५ लोखंडी काती, प्लास्टीक मूठ असलेला लोखंडी चाॅपर, लोखंडी ५ चाकू, २ चिसल, २४ पॅकेट दारूगोळा प्रत्येकी १ किलो, शिश्याचे छोटा बाॅल, भेकर जंगली जनावरांचे शिंग, सांबर जनावराचे शिंग, काळवीट जनावराची शिंग, चोशिंगा जनावराचे शिंग, एक पोपटी पाना, एक बेंचवाईस, २ लाकडी ठोकले बट आकाराचे, लाकडी बट बारोबार बंदूक, लोखंडी ठोकळा, लाकडी मूठ असलेला ठोकला ऐकून १ लाख ६६ हजार ६५० रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळून आल्याचे रोहा पोलिसांनी सांगितले. यात दुर्मिळ जंगली जनावरांचे शिंग किमतीत वर्णन करण्यात आलेले नाही. बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळल्याप्रकरणी आरोपी तन्मय भोकटे याच्यावर शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, ४,५ (क) (ख) २५ वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कलम २(३१) ४८, ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. सबंधीत आरोपीला अटक करण्यात आली. स्वतःच्या फायद्यासाठी शस्त्रसाठा करण्यात आल्याचे गुन्ह्यातील हेतू वर्णनात आले आहे. शस्त्रसाठा व दुर्मिळ प्राण्यांचे अवशेष साठ्याप्रकरणी अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभाग,रोहा पोलीस करत आहेत, आता मोठा संग्रही शस्त्रसाठा नेमका कशासाठी केला होता, तपासातून काय समोर येते ? याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *