श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र ‘दिंडोरी प्रणित’ चोंढी तर्फे बालसंकार शिबीर संपन्न

Share Now

76 Views

रोहा (विश्वजीत लुमन) अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील श्री स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्र ‘दिंडोरी प्रणित’ बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. गुरुपीठाच्या आदेशानुसार चोंढी केंद्रातर्फे व अनघा अनिल आमले व आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोरंडे गावी अधिकारी वाडी येथे सदरील मूल्यसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुले आणि मुली यांचा समावेश करण्यात आला होता. तर खुप चांगला प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरात एकूण ९० मुले व मुलींनी सहभाग नोंदवून शिबिरातील सर्वच उपक्रमांचा आनंद घेतला.दिवसभराच्या या शिबिर सत्रात गुरुपीठाकडून आलेल्या पत्रकाप्रमाणे नियोजन पद्धतीने कार्यवाही करून विक्रांत बर्गे, स्वप्नाली घरत, स्नेहा पाटील, नेहा गुळेकर, स्वाती राऊत, माधवी केंदकी,निलेश काठे, निशा राऊत, सौ. भातखंडे, पूजा गांधी, सौ. रेडीज, सौ. साधना ठाकूर, स्वरुपा कालवणकर, रेश्मा राऊत, संदीप ठाकूर आणि ममता आमले मोलाचे सहकार्य केले.

आरोग्य, आहार, आदर्श दिनचर्या व कायदा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन व व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सातत्याने गेली वीस वर्षे आशी शिबीरे या केंद्रामार्फत आयोजित केली जात आहेत. या शिवाय स्वामी समर्थ सेवेकरी व बालचमू यांच्यामुळे या शिबीराला शोभा आली. तर शिबिराच्या यशस्वितेसाठी नेमून दिलेल्या बालसंस्कार टीमने शिबिराचे योग्य आयोजन व नियोजन केले. याकामी केंद्रातील इतर सेवेकर्यांनीहि चांगले सहकार्य केले. मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या सर्व डाॅक्टर्स यांनी मुलांना आरोग्य व आहार तसेच दैनंदिन जीवनातील चांगल्या सवयी याबाबत चांगले मार्गदर्शन केले. यावेळी श्री. स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *