रोहात कोलाड नाक्यावर रंगलाय मटका, झुगाराचा खेळ, मात्र यामागचे वरदहस्त कोणाचा ? नागरीकांचा सवाल !

Share Now

152 Views

रोहा ( दिपक भगत ) रोहा तालुक्यात नेमक चालय तरी काय ? नेहमी शांत असणार्या रायगड जिल्ह्यातील हा तालुका आता दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटनेतुन चर्चेत येत आहे. जादुटोणा प्रकरण, हत्या प्रकरण, मटका – झुगार यातुन उद्भवणार्या हाणामार्या, हत्या, व्यसनाधिनता यासारख्या घटनांमुळे रोहा तालुक्यात नेमक चाललयं तरी काय ? असा संतप्त सवाल आज नागरीकांमधुन उपस्थित केला जात आहे.

झुगार – मटका – चक्रि यांसारख्या विघातक खेळाच व्यसन वयोवृद्धांसह तरुणांना लागव हि चिंतेची बाब म्हणावी लागेल. कारण या खेळामुळे त्या व्यक्तिंच जीवनमान सुधारेल कि नाहि माहिती नसता, केवळ कमावलेले पैसे या व्यसनात बुडवण्याच काम हि मंडळी नित्याने करीत आहेत. यामुळे पैशांची चणचण, हाताला काम नसणे, प्रापंचिक ओढाताण यामुळे एखादा व्यक्ति गैरकृत्य करण्यास प्रवृत्त होतो. आणि मग समाजात भीषण घटना घडताना दिसतात. आधीच बेरोजगारी त्यात जाहिरातीमध्ये मोठ मोठे कलावंत अशा खेळांच ब्रांडिंग करुन तरुणांना हे असले ऑनलाईन खेळ खेळण्यास प्रोत्साहीत करतात.त्यामुळे एकंदरीतच मोबाईलच अती वापर आणि ऑनलाईन झुगार यात आजची तरुणाई पुरती बुडाल्याच चित्र आहे.त्यात अवैध्यपणे चालणारे मटका-झुगार नाक्या-नाक्यावर,चौकाचौकत गुप्तपणे या खेळांचे डाव रंगलेले असतात.

मागील वर्षभरापासुन सातत्याने या अवैध्य धंद्याच्या विरोधात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सनिल इंगवले पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. मागील वर्षभरापासुन ते या मटाक-झुगार यांसारख्या अवैध्य धंद्याच्या विरोधात पोलिस प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु आजहि हे धंदे रोहा तालुक्यात तसेच चालु असल्याच चित्र दिसत असल्याची खंत ते बोलुन दाखवित आहेत. नुकत्याच कोलाड येथील मुंबई-गोवा महामार्गालगत असणार्या कोलाड नाक्यावर मटका-झुगार-चक्रि यांसारखे खेळ राजरोसपणे सुरु असल्याची पोलखोल इंगवले यांनी केली. या गंभीर घटनेकडे स्थानिक पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधत हे अवैध्य धंदे येत्या दोन दिवसांत बंद नाहि झाले तर येत्या २६ जाने. प्रजासत्ताक दिनी पोलिस स्टेशनसमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याच इंगवले यांनी जाहिर केल. त्यामुळे या अवैध्य धंद्यांचा पाठीराखा नेमका आहे तरी कोण ? पोलिस प्रशासनच्या नाकावर टिच्चुन हे असले अवैध्य प्रकार चालतात तरी कसे ? अशा अनेक प्रश्नची चर्चा आज संपुृण तालुक्यात रंगताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *