रोहा वरसे येथे सुदर्शन सी. एस. आर. फाऊंडेशन रोहा तर्फे “सुसंवाद प्रशिक्षण कार्यशाळा” व विशेष मार्गदर्शन कार्यक्रम, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Now

341 Views

रोहा (प्रतिनिधी) सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत  सी. एस. आर. हेड सौ. माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान, पंचायत समिती रोहा यांच्या सहकार्यातून मंगळवार दि. २३ जाने. रोजी वरसे येथे रोहा तालुक्यातील सर्व सीआरपी महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य यांच्यासाठी “सुसंवाद प्रशिक्षण कार्यशाळा” हा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

या कार्यक्रमात लेखक, सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते, व्यसनमुक्ती प्रेरणा संवर्धन तज्ञ किशोर काळोखे यांनी समजुतदार, सहनशीलता, सुसंवाद, समुदाय संवाद, ताणतणाव मुक्त या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमास रोहा तालुक्यातील सर्व सीआरपी व महिला बचत गट, प्रभाग संघ, ग्रामसंघचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य असे एकुण ११० महीला उपस्थिती होत्या. दरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, रोहा पंचायत समिती चे पदाधिकारी अक्षय खंदारे, रविंद्र राठोड, नेहा पाटील मॅडम तसेच सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड  सीएसआर विभागाचे वरिष्ठ कार्यकारी (सिनी.एक्झिक्यूटीव्ह) चेतन चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमर चांदणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *