सकल समजातर्फे न्यायहक्कासाठी मराठा आंदोलकांना पाच हजार भाकऱ्या

Share Now

95 Views

रोहा ( वार्ताहर ) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आहोरत्र झटणारे आणि योग दान देणारे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात यशस्वी सभा घेतल्या सभांना लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव भगिनी राहून समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सहकार्य करीत आहेत. शांतता पूर्ण आणि कायद्याचे पालन करून मराठा संघर्ष करून योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा २५ जानेवारी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून मुंबईकडे कूच करताना थांबणार आहे. दिंडीत आपले लाखो समाज बांधव देखील सहभागी झाले आहेत. यांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी रोहा तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातून किमान दहा भाकऱ्या तयार करून २५ जानेवारी २०२४ रोजी नितीन परब यांच्या कार्यालय येथे सकाळी नऊ वाजे पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.सुमारे पाच हजार भाकऱ्या या आंदोलन करणाऱ्या समाजाच्या बांधव भगिनीनसाठी देण्यात असल्याचे मराठा समाज प्रमूख प्रदीप आप्पा देशमुख यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी नितीन परब प्रशांत देशमुख राजेश काफरे अमोल देशमुख सुरेंद्र निंबाळकर सुहास येरूनकर परशुराम चव्हाण निलेश शिर्के मयुर पायगुडे सौ स्वरांजली शिर्के जगदिश देशमुख संदिप सावंत नाना दळवी आदि मराठा समाज बांधवांनी अथक परिश्रम आपल्या समाजासाठी घेतले. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी व मानवता जपत फुल ना फुलाची पाकळी म्हणुन येथील मुस्लिम समाजाने देखील सुमारे पाचशे भाकऱ्या या आंदोलनकरी मराठा समाजासाठी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *