साॅल्वे स्पेशालिस्टिज इंडिया प्रा.लि.कंपनीकडून रोहा शहरात सुरक्षे बाबत जनजागृती

Share Now

124 Views

रोहा (सुहास खरीवले) रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे पालन करा या अनुषंगाने रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील जागतीक स्तरावर नावलौकिक असलेल्या सॉल्वे स्पेशालिस्टीज प्रा. लिमिटेड कंपनी तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत तसेच सुरक्षा विषयावर रोहा पोलिस स्टेशन ते रोहा शहरात रॅली काढत वाहतुकीचे नियम तसेच आपल्या सुरक्षेबाबत या व्यवस्थापनाच्या वतीने जनजागृति करण्यात आली.

रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रस्ता सुरक्षा विषयक वरील कारखाना व्यवस्थापन यांच्या वतीने तसेच कंपनीचे साईट हेट ऑप्रेशन्सचे मोहित जेलाटे आणि ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर विजय चौगुले, राजेश हजारे,यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली येथील कर्मचारी वर्ग तसेच इत्यादींनी रोहा शहरात गुरूवारी २५ जानेवारी रोजी वाहतुकिबाबत वाहतूकदार तसेच वाहन चालकांनी नियमांचे पालन करा यावर रॅली काढत अभियानांतर्गत जनजागृती केली.

वाहन चालवताना आपली सुरक्षा बाळगा, नियमित हेल्मेट चा वापर करा वेगावर नियंत्रण ठेवा, अती घाई करू नका, वेगाने वाहने चालवू नका मृत्यूस आमंत्रण देऊ नका, होईल दोन मिनिटांचा उशीर परंतू वाहन चालवताना नियंत्रन ठेवा असे घोष वाक्य देत सरच्या रॅलीतून नागरीकांना जनजागृतीचा संदेश दिला.

रोहा पोलिस स्टेशन येथून तसेच तीन बत्ती नाका मारूती चौक आणि रोहा शहरात या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृतीचे संदेश दिले याला रोहा पोलिस स्टेशन यांच्या वतीने देखील उत्तम प्रतिसाद मिळाला तर आयोजित केलेल्या या उपक्रमात सोल्वे कंपनीच्या कर्मचारी वर्गाने बहुसंख्येने उपस्थीत दर्शवित याची जनजागृतीचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *