रोहा येथे लवकरच शासकीय अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन केंद्र सुरु करणार ! : धनंजय मुंडे कृषी मंत्री

Share Now

243 Views

रोहा : (रविंद्र कान्हेकर) कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी खा. सुनील तटकरे यांच्यामुळे मिळाली. समाज कल्याण मंत्री असतानाही रायगडातील कामे मार्गी लावली तर आता कृषी मंत्री म्हणून मुरुड तालुक्यात सुपारी संशोधन केंद्र लवकरच मार्गी लागेल तर रोह्यात सुद्धा लवकरच शासकीय अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन केंद्र सुरु करणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर सौ. वरदा सुनील तटकरे कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाला सुद्धा निधी कमी पडू देणार नसल्याचे वक्तव्य केले. खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या खासदार निधीतून पंचवीस लक्ष निधी उपलब्ध केला आहे. आता तटकरे साहेब थोरला म्हटल्याप्रमाणे माझाही खारीचा वाटा राहील असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. एम. बी. मोरे संचालित सौ. वरदा सुनील तटकरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि कै. कुसुमताई मनोहर पाशिलकर कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे भूमिपूजन व नमकरण सोहळा धाटाव येथे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी सरचिटणीस विजयराव मोरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, वरदाताई सुनील तटकरे, वेदांती तटकरे, सुरेश मगर, ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी सभापती रामचंद्र सकपाळ, शिवराम शिंदे, रोहा सिटीझन फोरम अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख, एम. बी. मोरे फाऊंदेशनचे अशोक मोरे, अनिल भगत, उत्तम मोरे,वकील उत्तम जाधव, मारुती खरिवले, सरपंच सुवर्णा रटाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलताना ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले कि,आमच्याकडे शंभर दोनशे किमी अनंतरावर नुसती जमीन दिसत असली तरी कोकनात मात्र एक दोन किमी अंतरावर नुसते पाणीच पाणी दिसत आहे. अमेझोन, फ्लिप कार्ड यांसारख्या कंपनीने आता यापुढे शेतकऱ्यांजवळ केला असल्याने यापुढे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना होणार आहे. आणि हे काम आटपून मी थेट रोह्याला महाविद्यालयाचे भूमिपूजन करायला आलो याचा सार्थ अभिमान मला आहे. मुरुडमध्ये लवकरच सुपारी संशोधन केंद्र सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहा तालुक्यात महिला महाविद्यालय होणं म्हणजे महिलांच्या सर्वागीण विकासाला चालना देण्याचे काम या महाविद्यालयानिमित्त होणार आहे. रोहा तालुक्यातील एम. बी. मोरे ही संस्था सन २००५ सालापासून सुरु आहे. शिक्षणाबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. तालुक्यातील पहिले महिला महाविद्यालय उभे होत आहे. सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा,सुसज्ज वर्गखोल्या, तीन मजली इमारत, सुसज्ज मैदान उभे राहण्यासाठी पाच कोटी छप्पन्न लक्ष निधी अपेक्षित आहे. त्यात खारीचा सहभाग माझा असणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *