मागच्या निवडणुकीत मोदी लाटेत रायगडकर ठाम राहिले,पण रायगडमधुन निवडुण आलेला मात्र या मोदी लाटेत वाहुन गेला…!

Share Now

113 Views

रोहा (वार्ताहर) पेण तालुक्यात आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झंझावती सभेला सुरुवात झालेली असुन रायगडमध्ये लगातार सहा सभा घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत अनेक मुद्द्यावर हात घातला. आतापर्यंत तुम्ही मातोश्रीवर येत होतात इथून पुढे मी तुमच्यापर्यंत येणार आहे. भाजपाने आजच २०२४ चा अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प असणार यावर उपस्थितांमधुन टाळ्यांचा गडगडाट झाला. अर्थसंकल्पनातून एक गोष्ट सिद्ध झाली की सुटा बुटातलं हे सरकार आता सर्वसामान्य जनतेसाठी इथून पुढे काम करणार आहे. अर्थसंकल्प म्हणजे निव्वल जादूचे प्रयोग सुरू आहे.अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांना टोपी घालण्याची काम…!

मी मुख्यमंत्री असताना ज्यावेळी कोकणामध्ये तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्यावेळी मी प्रत्यक्ष पाहणी करून लोकांना मदत केली होती, अगदी केंद्राचे निकष बाजुला ठेवुन आपल्या सरकारनी मदत केली होती. कोकणामध्ये ज्यावेळी तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्यावेळी केंद्राचा एक तरी माणूस तुमच्याकडे आला होता का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. अडचणीच्या काळात न दिसणारे आज मात्र निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. मत हवी असली की “मेरे प्यारे देशवासियो” म्हणायचं आणि एकदा निवडणूक झाली की तुमचं तुम्ही बघून घ्या.! सर्वसामान्य चिरडणं हाच यांचा विकास आहे. आयोध्या मध्ये राम मंदिर झालं याचा आम्हाला देखील अभिमान आहे त्याच्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा देखील मोलाचे योगदान होतं हे मला कुणाला सांगायची गरज नाही. हा राम म्हणजे तुमची खाजगी प्रॉपर्टी नाही.हा राम सर्व रामभक्तांचा आहे.त्या सोहळ्यादरम्यान एका निर्बुद्ध माणसाने मोदींची तुलना महाराजांशी केली महाराजांशी तुलना करणारे आमच्यासाठी निर्बुद्ध आणि बिनडोक आहेत.

मी रायगडकरांचे अभार मानतो कारण रायगड हा त्यावेळी देखील मोदी लाटेत वाहून गेला नव्हता पुढेहि जाणार नाही. पण रायगड मधून जो निवडून आलाय तो मात्र मोदी लाटेत वाहून गेलाय, माझा रायगड मात्र तसाच आहे. आणि रायगड मध्ये मला असं जास्त वाटत प्रचार करण्याची गरज वाटत नाहि. मागच्या वेळेस देखील रायगडकरांनी मोदी लाटेच्या विरोधात मतदान केलं होतं यावेळी देखील तसेच चित्र रायगडकरांचा असेल. “आपकी बार चाळिस के पार” अशा घोषणा देणार्यांना मग नितीश कुमार यांचे सहकार्य का लागतं.? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.मोदी गॅरंटी मध्ये अजित पवार यांच्यासारख्यांना क्लिनचीट दिली जाते. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच, त्यांना क्लीनचीट देणारे देखील हेच, म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या मुलाला ईडीची नोटीस आली. भाजपवाल्यांना मी एवढंच सांगतो की आमची लढाई ही कोणत्याही पक्षाशी नसून ती हुकूमशाहीच्या विरोधातले आहे आणि पुन्हा जर तुम्ही हा देश हुकूमशहाच्या हातात देणार असाल तर पुढच्या पिढ्या तुम्हाला आम्हाला माफ करणार नाहीत.या हुकूमशहाच्या विरोधात जी इंडिया आघाडी झालेली आहे तिला तुम्ही मतदान करा.

मागच्या एका कार्यक्रमात खुद्द पवार साहेबांनी मला सांगितलं होतं की यावेळी या रायगडच्या गद्दाराला पाडायचा आहे. इकडे गद्दारांची घराणेशाही आहे. भाजपने जाहीर करावे की आम्ही घराणेशाहीला यावेळी तिकीट देणार नाही. भाजपसोबत आम्ही एक हिंदुत्व या नात्याने जवळ होतो आमच्यासाठी या देशाला मानणारा हा हिंदू होता भाजपने सांगावं की तुमचं हिंदुत्व नेमकं काय आहे ? मी जरी प्रत्यक्ष पुन्हा रायगड मध्ये आलो नाही तरी मला या रायगड मधून बहुसंख्य लीडने मतदान हवं आहे याचं मला तुम्ही एक मुखाने आश्वासन द्या असं उपस्थित पेण मधील जनतेकडून उद्धव ठाकरे यांनी वदवून घेतलं. तसेच जाहिरातींना भुलू नका तुम्ही एकमेकांना आणि सर्व नागरिकांना सांगा की मोदीच्या योजना या फसव्या योजना आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *