आमच्या ओबीसीसह कुणबी समाजावर होणारा अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाहि ; कुणबी नेते अशोक वालम

Share Now

86 Views

रोहा (दिपक भगत) मराठा समाजाने मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनाला ब-यापैकि यश मिळाले. परंतु महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबतीत काढलेल्या शासन अध्यादेशात अनेक त्रुटि असल्याकारणाने मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाल्याच चित्र पहावयास मिळत होत. सरकारने जर मराठा समाजची फसवणुक केली तर पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचा गर्भित ईशारा मनोज जरांगे यानी उपोषण मागे घेतानाच दिला होता. यासर्व घडामोडी घडत असतानाच आता ओबीसी समाज देखील आक्रमक होताना दिसत आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठ नेते मनोज जरांगे यांच्यात दिवसागणीक होणारी शाब्दिक चकमच महाराष्ट्राला परीचीत आहे. परंतु आता याच पार्शवभुमीवर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आक्रमक झाल्याचे दिसत आहे.सात जिल्हयात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्थेने आज राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत असणा-या कुणबी संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांची शनिवार दि. १० फेब्रु. रोजी सायं ०५:३० वाजता दादर पश्चिम येथील देवराज हाॅल येथे बैठक आयोजित केलेली होती.

या बैठकिला कुणबी समाजातील विविध पदाधिकारी,कुणबी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा को घाट घातला आहे. त्याविरोधात एकत्र येऊन संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी महाराष्ट्रातील सर्वच संघटना व समाज संघटित करण्यासाठी “कुणबी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य” या संघटनेची स्थापना सर्वानुमते करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक वालम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.तसेच सरचिटणीसपदी डॉ. प्रकाश भांगरथ, कार्याध्यक्षपदी विश्वनाथ पाटील अशा नेमणुका करण्यात आल्या. यावेळी बोलताना नवनिर्वाचीत अध्यक्ष अशोक वालम यांनी आपल्या भाषणात बोलताना शासनाला ठणकावुन सांगितल कि शासनाने असा घाईघाईत कोणताच चुकीचा निर्णय घेऊ नये. ज्यामुळे ओबीसी समाजामधील एक घटक असलेल्या आमच्या कुणबी समाजावर अन्याय होईल.सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास लवकरात लवकर आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेवु.

या कार्यक्रमात श्री अरविंद डाफले यानी प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश भांगरथ यांनी शासन कशा प्रकारे आपल्यावर अन्याय करीत आहे यावर यथोचित मार्गदर्शन केले.श्री विश्वनाथ पाटील, चंद्रकांत बावकर यांनी मार्गदर्शन केले. या शिवाय ब-याच पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत मांडून संपूर्ण महाराष्ट्रातील कुणबी समाज संघटीत करावा असे आवाहन करण्यात आले. शेवटी संघाध्यक्ष यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून सभा समाप्त केली. विचारमंचावर असंख्य मान्यवर उपस्थित होते. गोपाळ शेळके, परशुराम पीताम्बरे, जाधव, बारे, नंदकुमार मोहिते, रविंद्र मटकर, माधव कांबळे, प्रकाश तरळ, कृष्णा कोबनाक उपस्थित होते. या बैठकिचे सूत्रसंचालन श्री संभाजी काजरेकर यानी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *