तिचे वैद्यकीय स्वप्न अधूरे, युक्रेनहून मृत्यू होऊनच परतली, आई व नातलगांनी फोडला हंबरडा, हरहुन्नरी प्रचितीच्या जाण्याने मोठा धक्का

Share Now

1,352 Views

रोहा (प्रतिनिधी) आधी वडिलांचा छत्र हरपला, आईने व मामाने मोठ्या जिद्दीने उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन देशात पाठवले. आईचे पाठबळ, मामा मामीचे कायम प्रोत्साहन तिचे स्वप्न पूर्णत्वास येऊ लागले. अखेर ती युक्रेनला डॉक्टर होण्यासाठी गेली. एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत असतानाच नियतीने घाला घातला. केसपुळी होते काय, उपचारात बरी होता होता त्याच केसपुळीने शेवटी स्वप्नांचा जीव घेतला. त्या गोंडस व हसऱ्या प्रचिती दीपक पवार वय २१ ह्या तरुणीवर बुधवारी खारी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी क्षण पवार, आपणकर व मित्रपरिवारावर आला. प्रचिती पवार हिचे युक्रेनचे वैद्यकीय स्वप्न अधूरेच राहिले. उलट आई व सबंध कुटुंबावर प्रचितीचे अंत्यदर्शन घेण्याचा दुःखद प्रसंग आला. मृत्यू होऊन परतलेल्या प्रचितीच्या शेवटच्या दर्शनाने आई, आजी, मामा सर्वच नातलगांनी अक्षरशः हंबरडा फोडला. गावकरी, सबंध रोहेकरांचे डोळे अक्षरशः पाणावले. हरहुन्नरी प्रचितीच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. दरम्यान, डॉक्टर होण्याचे उराशी स्वप्न बाळगलेली प्रचिती तरुणांची आयडॉल होती. आई वडिलांचे स्वप्न, मामांचे पाठबळ याच जोरावर युक्रेनसारख्या प्रगत राष्ट्रात वैद्यकीय शिक्षणासाठी गेली. मात्र डॉक्टर होऊन परतण्याआधीच तिच जगातून कायमचे जाणे पवार, आपणकर परिवाराच्या नशिबात आले तर सतत हसरी, काहीतरी वेगळं करण्याची धमक असलेली प्रचिती पवार ही तरुणी कायमची निघून गेल्याने विविध क्षेत्रातील मान्यवर, तरुणांनी शोक व्यक्त केला आहे.

प्रचिती दीपक पवार ही पोलीस सेवेत कार्यरत राहिलेल्या दीपक पवार यांची मुलगी आहे. वडील दीपक पवार यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर प्रचितीची आई आई व भावांच्या पाठबळावर खंबीरपणे उभे राहून जुळ्या मुलींच्या स्वप्नामागे ठाम उभी राहिली. दोन्ही मुली प्रचंड उत्साही, काहीतरी नवे करण्याची धमक असलेल्या सर्वांनीच पाहिल्या. मलाही डॉक्टर व्हायचे आहे म्हणत ध्येयाच्या जोरावर प्रचिती पवार हिने युक्रेन देश गाठले. त्यासाठी आईने कठोर मेहनतीने प्रोत्साहन दिले. डॉक्टर तेजकुमार आपणकर, सतेज आपणकर यांनी सतत पाठबळ दिले. त्याच जोरावर प्रचितीचे युक्रेनच्या विद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण चालू होते. ती चौथ्या वर्षात शिकत होती. युद्ध काळात काही महिने प्रचिती मायदेशी होती. युद्धाचे सावट काहीसे दूर झाल्याने पुन्हा नव्या उत्साहाने युक्रेनला गेली. शिक्षणात रममान झालेली असताना मागील आठवड्यात प्रचितीला केसपुळीला सामोरे जावे लागले. मूळात थंड प्रांतात त्याच केसपुळीने प्रखर रूप धारण केले. त्यासाठी प्रचिती युक्रेनच्या दवाखान्यात उपचार घेत होती. केसपुळीवर शस्त्रक्रियाही झाली. मात्र केसपुळीने वजा थंड वातावरणात शरीरात विष धारण केले, तेच तिच्या मृत्यूला कारण ठरण्याचे सांगण्यात आले. उपचाराला प्रतिसाद देते म्हणता म्हणता प्रचितीची धक्कादायकपणे प्राणज्योत मालवली आणि आई, आजी, मामा सबंध परिवार अक्षरशः कोडमडला. सर्वच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

प्रचिती पवार हिचा मृतदेह बुधवारी दुपारी मामाच्या गावी खारी येथे आणण्यात आले. डॉक्टर होऊन येण्याचे स्वप्न बघणाऱ्या आई व सर्वांनाच प्रचितीचा अंत्यदर्शन घेण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आला. प्रचितीचे अखेरचे दर्शन घेतात आई, आजी सर्वच परिवाराने अक्षरशः हंबरडा फोडला. नेमके काय झाले ? याच कल्पनेने सर्वांनाच भरून आले. प्रचिती पवार हिच्या अंत्ययात्रेत नातलग, समाज बांधव, रोहा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हसत, खेळत असलेल्या, विविध कलागुणांत झोपून देत अनेक तरुणांना स्वप्न देणाऱ्या प्रचितीचे असे अचानक जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. पवार, आपणकर कुटुंबाची हानी कधीच न भरून येणारी आहे. दुसऱ्यांच्या सेवेसाठी नेहमीच कार्यरत असणाऱ्या कुटुंबावर हा मोठा आघात आहे. डॉक्टर होण्याचे प्रचितीचे सर्वांसाठीचे स्वप्न अधूरेच राहिले. प्रचिती पवार हिचे धार्मिक विधी शुक्रवारी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी राहत्या घरी पवार मेन्शन, खारी येथे होणार आहे अशी माहिती पवार, आपणकर परिवाराने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *