अध्ययवत पद्धतीचे मल्टीप्लस हॉस्पिटल रोह्यात उभारणार : खा. सुनील तटकरे

Share Now

85 Views

रोहा : (रविंद्र कान्हेकर) कोरोना सारख्या काळात आपण रोह्यातील उपाजिल्हा रुग्णालयात नागरिकांना उपचार मिळावेत म्हणून ऑक्सिजन पुरवठ्या सहित सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना या महाभयंकर आजारापासून रोहेकरांचे जीव वाचविण्यात आपल्याला यश आले. रोह्यात चांगले हॉस्पिटल उभारावे म्हणून नागरिकांतून सततची मागणी होत आहे. आगामी काळात अध्ययवत पद्धतीचे मल्टीप्लस हॉस्पिटल रोह्यात उभारणार असल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. रोहा अष्टमी येथे व्यायाम शाळा अद्यावत जिम तयार करणे या कामाचे भूमिपूजन, रोहा नगरपरिषदेच्या स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक व शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारत तयार करणे, रोहा येथील श्री हनुमान मंदिर नूतनीकरण या कामाचे भूमिपूजन प्रसंगी झालेल्या राम मारुती चौक येथील सभेत 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते बोलत होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रशासक तथा मुख्याधिकारी रोहा अष्टमी नगरपरिषद पंकज अनिल भुसे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, डॉ. अशोक जाधव, राष्ट्रवादी सरचिटणीस विजयराव मोरे, मारुती मंदिर ट्रस्ट विश्वस्त मोतीलाल जैन, विश्वस्त मारुती मंदिर ट्रस्ट रोहा, मारुती मंदिर ट्रस्ट रोहा विश्वस्त अरविंद करंबे, स्वाध्याय परिवाराचे मकरंद बारटक्के, स्पंदनच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, समीर सकपाळ, मराठा समाज अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख, राम मारुती भक्तगण, रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलताना खा. तटकरे म्हणाले कि, २ कोटी १३ लक्ष अत्याधुनिक यंत्रणा तंत्रज्ञान प्लेट लेटस्, प्लाजमा, रक्त ,इंक्युटर, रक्त पृथकरणं अपर्णा फाऊंडेशन डी. वाय पाटील हॉस्पिटल येथील सुसज्ज ब्लड बँकला आपण चालवायला दिले आहे. याव्यतिरिक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स, रोहा बस स्थानक, मेडिकल कॉलेज, ५०० खाट्टांचे रुग्णालय, वरसे येथे महिलांसाठी जिल्हा रुग्णालय डॉ. सी. डी. देशमुख डायवरसिटी पार्क, येत्या काही दिवसांत हनुमान मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर कामाचे शुभारंभ करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांमध्ये अत्याधुनिक नाट्यगृह सुपूर्द केला जाईल.

पुढील वर्षी हनुमान जयंती अगोदर मंदिर उभे राहील. या मंदिराचे डिझाईन मुस्लिम वास्तू विशारद तज्ज्ञांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकरंद बारटक्के यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचलन प्रतीक राक्षे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *