सूर्य नमस्कार दिना निमित्त ३५० महिलांनी केले सूर्य नमस्कार

Share Now

74 Views

रोहा (प्रतिनिधी ) शरीर सदृढ राहण्यासाठी रोजच व्यायाम करणे गरजे असते. यात महिलांपेक्षा पुरुष मंडळी आघाडीवर असतात मात्र रोहे शहरातील महिलांनी घरातील कामे, इतर ताणतणाव व इतर महत्वाची कामे बाजूला सारून सूर्य नमस्कार दिनाचे औचित्य साधून एकूण ३५० महिलांनी सूर्य नमस्कार मारण्याचा प्रथमच विक्रम केला आहे. सूर्य नमस्कार हा व्यायामातील एक महत्वाचा प्रकार असून सामान्य व्यक्तीला सहज न जमाणारा हा प्रकार महिलांनी करून दाखवल्या बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होतं आहे. शुक्रवारी ( ता. १६ ) रोजी सूर्य नमस्कार दिना निमित्ताने रोहा अष्टमी नगर पालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे मंत्री अदिती तटकरे व आम. अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा नगर पालिकेच्या कुंडलिका नदी संवर्धन मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

योगाचार्य विभा चोरगे यांच्या नेतृत्वाखाली ३५० महिलांनी सूर्यनमस्कर केले. यात विशेषतः पूजा मेहता, डॉ. जया करवा, सुप्रिया जाधव, नीता पाटील, मिताली थरवल, ज्योती तेंडुलकर, रीमा गुरव, सुरेखा हुमे, निपा शाह, प्रीती शाह, विद्या नुला, स्वाती दिवाण, शुभांगी गायकवाड, अनुष्का गुरव, सुरेखा कदम, मीनल घरत, मानसी शिंदे, दीपिका कोरपे करिष्मा सुर्वे व रिदा दिवेकर या २१ महिलांनी प्रत्येकी ५० सूर्य नमस्कार मारल्या. त्या बद्दल त्यांचे कौतुक होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *