आगरी समाजाची शान सागरी कन्या कुमारी सृष्टी मुंबईकर यमुना स्त्री सन्मान पुरस्काराने झाली सन्मानित !

Share Now

100 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) आगरी, कोळी समाज हा धाडशी वृत्तीचा दर्या सारंग समाज समुद्राच्या तुफान लाटांवर स्वार होऊन आपल्या बलदंड बाहूनीं आकाशाला गवसणी घालणारा हा राकट, कणखर समाज आणि ह्याच धाडशी – जिगरबाज आगरी समाजातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेश्वी गावाची सागरी कन्या कुमारी सृष्टी राजश्री राजेंद्र मुंबईकर आज अथांग समुद्राला आपल्या कवेत सामावून घेण्याकरिता सरसावली आहे ती मर्चंड नेव्ही मेरी टाईम इंडस्ट्रीज ह्या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या मर्क्स कंपनीच्या दळणवळणाच्या समुद्री जहाजावर सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र प्राप्त करून मेरी टाईम इंडस्ट्रीजच्या जगभरातील प्रवासा करिता आणि संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यातील समुद्रावर स्वार होण्याकरिता सीफेरर हा परवाना (लायसेन्स ) प्राप्त झालेली आगरी समाजातील पहिली सागरी कन्या कुमारी सृष्टी राजश्री राजेंद्र मुंबईकर हिने मर्चंड नेव्ही क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत तिला तिच्या भविष्यातील यशस्वी धाडशी प्रवासाच्या वाटचाली करिता प्रोत्साहित करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत जेष्ठ कामगार नेते आणि काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत- अध्यक्ष यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था शेलघर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण १२ ( बारा ) महिलांना “यमुना स्त्री सन्मान पुरस्कार ” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यात आगरी समाजाची शान आणि रायगडचा अभिमान पहिली सागरी कन्या कुमारी सृष्टी राजश्री राजेंद्र मुंबईकर हिला तिने मर्चंड नेव्ही क्षेत्रात घेतलेल्या गगनभरारी कर्तृत्वाची दखल घेऊन “यमुना स्त्री सन्मान पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले. भारत देशात १३५ वर्षा नंतर पहिल्यांदाच मर्चंड नेव्ही क्षेत्रात जी.पी.रेटिंग मध्ये मुलींची भरती करण्यात आली. त्यात देशभरातून एकूण ३२०० मुलींमधून १९ मुलींची निवड करण्यात आली. त्यात रायगडची पहिली सागरी कन्या म्हणून उरण तालुक्यातील सृष्टी मुंबईकर हीने जी. पी. रेटिंग मध्ये अव्वल येत आपलं यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून येत्या पुढील महिन्यातच आपल्या उज्वल स्वप्नांची गगन भरारी घेत समुद्राला आपल्या कवेत सामावून घेण्याकरिता नेदरलँड कीव डेन्मार्क येथे रवाना होणार आहे. आणि हिच्या ह्याच अभिमानास्पद कामगिरी दखल घेत शेलघर येथील सुखकर्ता बंगला येथे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांच्या वतीने यमुना स्त्री सन्मान पुरस्कार कार्यक्रमा करिता प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून उपस्थित राहिलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर,पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, गरीब रुग्णांकरिता साक्षात देवदूत असणारे गुणे हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिरीश गुणे, जेष्ठ कामगार नेते आणि काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अतुल पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते “यमुना स्त्री सन्मान पुरस्कार” हा मानाचा पुरस्का सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि मानाच वस्त्र पेशवाई पैठणी देऊन गौरविण्यात आले. सोबतच ह्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित सृष्टी मुंबईकर हीचे आई – बाबा राजू मुंबईकर, राणीताई मुंबईकर, सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित, सुप्रसिद्ध कोरियोग्राफर पप्पूदादा सूर्यराव, सुरेंद्र पाटील ही सर्व मंडळी उपस्थित होती. यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांनी कुमारी सृष्टी मुंबईकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. आणि तिला तिच्या पुढील यशस्वी वाटचाली करिता खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या. त्याच सोबत ह्या धाडशी क्षेत्रात आपलं करिअर घडवण्यासाठी उज्वल भविष्याची गगन भरारी घेण्याकरिता घेतलेल्या आपल्या धाडशी निर्णयाला पाठिंबा देणारे आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तिचे आई – बाबा राजू मुंबईकर आणि राणीताई मुंबईकर यांचे सुद्धा सर्व मान्यवरांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *