मनोज पाटील यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

Share Now

217 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांना मंगळवारी प्रदान करण्यात आला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी आदींसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख १५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नरिमन पॉईंट येथे झालेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते. पाटील यांनी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून २५ वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली शाखेत ते कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांना शैक्षणिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांने गौरविण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *