दमखाडी, रोहा येथील उदय खानोलकर यांना पुत्रशोक, हर हुन्नरी प्रथमेश खानोलकरचे निधन

Share Now

128 Views

रोहा (वार्ताहर) रोह्यात ऑर्केस्ट्रॉ, हास्य नाटक आदी विविध सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रमाची मेजवानी देऊन प्रेषक रसिकांच्या मनावर राज कारणारे, दमखाडी येथील रहिवासी उदय खानोलकर यांचे एकुलता एक मुलगा प्रथमेश खानोलकर याचे वयाच्या ३८ व्या वर्षी अकस्मित निधन झाले.

प्रथमेश खानोलकर हा एमआयडीसीमधील ट्रान्सवर्ड या कंपनीमध्ये काम करत होता. तसेच ते कलामंच संस्थेचे संस्थापक सदस्य व राजकीय क्षेत्रात नेहमीच सहभागी असत. राष्ट्रवादी पक्षाचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागत असत. त्याची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असून कोरोना काळात त्याने सर्वाना मदत सहकार्य केले आहे. प्रथमेशच्या अचानक निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्र परिवार सर्वांनाच धक्का बसला. 

प्रथमेश अतिशय प्रेमळ, लोकाभिमुख तरुण होता, या तरुण वयात त्याला एक आजार झालं, त्यातून कॅन्सर निदान झाले, उपचाराला प्रतिसाद देत बरा होऊन तो घरीही आला होता, मी बरा झालो असे सांगत तो अनेकांना भेटलाही, सर्व छान चालले असताना त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला, त्यात तो खचला, अखेर प्रथमेश याची आजारा सोबतची झुंझ संपली. अखेर प्रथमेश आजारा पुढे हरला, गोड स्वभावाच्या प्रथमेशच्या अचानक निधनाचे वृत्त समजताच सर्वांनाच धक्का बसला. रोहा शहर व परिसरात शोक व्यक्त करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानोली, ता. वेंगुर्ली येथील रहिवासी पण त्याची कर्मभूमी रोहा राहिली.

प्रथमेश खानोलकर याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानोली, ता. वेंगुर्ली येथील रहिवासी पण कर्मभूमि रोहा राहिली आहे. प्रथमेश खानोलकर याच्या अंत्ययात्रेत रोहयातील सर्व नगरसेवक, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते कला मंच संस्थेचे सभासद, ओम साई सोसायटीचे सर्व सदस्य, ट्रान्सवर्ड कंपनीचे सर्व कर्मचारी, खानोली गावातील नातेवाईक, मित्र परिवार यांनी उपस्थित राहून भावपुर्ण श्रध्दांजली वाहली. कै. प्रथमेश खानोलकर याचे दशक्रिया विधी मंगळवार १९ मार्च आणि तेरावे शुक्रवार २२ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानोली, ता. वेंगुर्ली येथे होणार आहे. त्याच्या पश्चात आई वडिल, पत्नी असा परिवार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *