रोहा महिला मंडळातर्फे स्नेहा अंबरे यांचा सत्कार

Share Now

186 Views

रोहा ( रविंद्र कान्हेकर ) रोहा महिला मंडळ हे १९४५ साली स्थापन झाले. वर्षातून ७ ते ८ उपक्रम या मंडळाच्या वतीने केले जातात. रोहा महिला मंडळाकडून या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम करून महिलांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या व रोह्यात सांस्कृतिक चळवळ उभारून त्यांना रंगमंच उपलब्ध करून देणाऱ्या स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा आंब्रे यांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून रोह्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या सत्कार प्रसंगी आपल्या भाषणात स्नेहा आंब्रे म्हणाल्या कि, सरकारने स्त्रियांसाठी अनेक कायदे केले आहेत. बचत गटासाठी अनेक योजना आणल्या आहेत. स्त्रिया त्याचा फायदा घेऊन आज सक्षम होताना दिसत आहेत. पण तरीही आजच्या घडीला ३० टक्के महिला पुरुष प्रधान संस्कृतीला बळी पडताना दिसत आहेत. या स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी आपण स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे. रोहा महिला मंडळाने अभिनंदन केले हे माझ्यासाठी खुप मोलाचे आहे असेही त्या म्हणाल्या. महिला मंडळाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळाच्या अध्यक्षा साधना जोशी(गांगल) यांनी तर आभार वंदना विलास राजे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *