उरण ( विठ्ठल ममताबादे ) तालुक्यातील कवीलेखकांनाच केवळ गौरविण्याचे न करता सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील समाज हितावह कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना गौरविण्याचे मोठे कार्य उरणची कोमसाप करते ते अभिमानास्पद आहे असे विचार समाज सेविका काम्रेड हेमलता पाटील यांनी १०१ व्या मधुबन कट्टा कविसम्मेलनात विमला तलाव उरण येथे मांडले. यावेळी हेमलताताई पाटील, कुसुमताई ठाकूर, प्राचार्य प्रल्हाद पवार, कोरिओग्राफर हेमंत पाटील, कवयित्री हेमा पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) तर्फे प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला विमला तलाव उरण शहर येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी हेमलता पाटील यांनी मनोगत व्यक्त करून कोमसापच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विजय कांबळे होते. रायगडभूषण प्रा एल बी पाटील, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, मारुती तांबे, प्रा. ओहोळ, प्रा. सोनावणे, कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक म. का. म्हात्रे यांनी केले. कवी संमेलनात अनिल भोईर, अनुज शिवकर, संग्राम तोगरे, मारुती तांबे, मिस्त्री सुरेश अजय शिवकर, भगवान म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, न. म. पाटील, हेमांगी म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे यांनी “वसंत ऋतू “आणि” शिमगा ” या दिलेल्या विषयांवर कविता सादर केल्या. कोमसापचे माजी सचिव वसंत राऊत यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील सेवक यांचा सन्मान करणारी तालुक्यातील कोमसाप ही प्रमुख संस्था आहे – काम्रेड हेमलता पाटील
153 Views