भाजपा, मित्र पक्षाच्या उमेदवाराचा पाडाव करण्याचा निर्धार, निषेधार्थ रेशन साड्या केल्या परत, तटकरेंना मोठा धोका ? उल्काताई महाजन यांचा गर्भित ईशारा

Share Now

436 Views

रोहा (प्रतिनिधी) देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली. शेतकरी संकटात आहे. महिला सुरक्षीत नाहीत, भिकेचे तुकडे फेका, हक्क काढून घ्या, असेच भाजपाचे देश, राज्यात सुरू आहे. जुलमी कायदे श्रमिक कष्टकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. तेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकार महिलांना रेशन दुकानातून साडी देत आहे, महिला अत्याचाराविरोधी गुन्हे दाखल करत नाहीत, गुन्हेगार भाजपा, मित्रपक्ष सत्ताधारी असतील तर मोकाट सोडले जातात, आरोपींचा हार घालून सत्कार केला जातो हे भयानक आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी, अत्याचारी सरकारकडून साड्या घेणे कितपत योग्य ? महिलांची लाज, मानसन्मान सरकार राखत नाही, याच भाजप सरकार धोरणाच्या निषेधार्थ तालुक्यातील शेकडो श्रमिक, कष्टकरी महिलांनी साड्या परत केल्याची मोठी घटना गुरूवारी घडली. दुसरीकडे अत्याचारी, जुलमी भाजपा यांसह मित्र पक्षाच्या उमेदवाराचा पाडाव करण्याचा निर्धार भारत जोडो अभियानाच्या राज्य समन्वयक, प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन यांनी व्यक्त केल्याने रायगड लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सुनील तटकरे यांना मोठा धक्का असल्याचे समोर आले. दरम्यान, मागील निवडणुकीत संविधान बचावच्या बाजूने असणाऱ्या लोकसभेच्या उमेदवारांना मदत केली होती. सुनिल तटकरेंना श्रमिक कष्टकरी समाजाचा मोठा फायदा झाला, यावेळी तसे नाही, श्रमिक कष्टकऱ्यांची ताकद दाखवून देणार, भाजपा, मित्र पक्षाचा पाडाव करणार असा अप्रत्यक्ष गर्भित ईशारा महाजन यांनी दिल्याने लोकसभेचे संभाव्य उमेदवार सुनिल तटकरे यांना आधीच भाजपा, शिंदे अंतर्गत पदाधिकारी नाराज राजकारणात कितपत फतका बसतो ? याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील श्रमिक, कष्टकरी आदिवासी महिलांना शिंदे फडणवीस सरकारने रेशन दुकानातून साड्या वाटप केल्या. मात्र रायगड जिल्ह्यातील हजारो महिलांनी सरकारच्या अत्याचारी महिला धोरणाच्या निषेधार्थ साड्या परत करण्याची मोहीम अधिक व्यापकपणे सुरू केल्याचे गुरुवारी समोर आले. रोहा तालुक्यातील कष्टकरी शेकडो महिलांनी रेशन दुकानातून दिलेल्या साड्या तहसीलदार किशोर देशमुख यांना परत करत सरकारचा निषेध केला. सर्वहरा जन आंदोलनाच्या नेत्या, आताच्या भारत जोडो अभियानाच्या समन्वयक उल्काताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सोपान सुतार, चंदादेवी तिवारी, समीर ढुमणे, उमेश ढुमणे, लता वाघमारे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उल्काताई महाजन यांनी भाजपा सरकारच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला. भाजप सरकार संविधान विरोधी आहे, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे वेळीच धोका ओळखून भाजपाचा पाडाव करणे हे गरजेचे आहे. कामगार, महिला शेतकऱ्यांविरोधात जुलमी कायदे आणलेत. रेशन दुकानात मोफत धान्य वाटण्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात शेतकरी आत्महत्या वाढीच्या १४ जिल्ह्यात मोफत धान्य रद्द केले, हे संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दखल घेतली जात नाही. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. मणिपूर काय झाले, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्दही बोलत नाहीत. मग साड्या घेणे हे कितपत योग्य आहे, हे विचारताच महिलांनी उत्स्फूर्तपणेे साड्या परत करत निषेध करण्याचा निर्धार केला. आमच्या भगिनी महिलांची लाज, मानसन्मान सरकार राखत नसेल तर साड्या घेणार नाहीत, त्या साड्या परत करत आहोत असे उल्काताई महाजन यांनी भाषणातून सांगितले. महिलाविरोधी धोरणाचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. तहसीलदार किशोर देशमुख यांना शेकडो कष्टकरी महिलांनी साड्या परत केल्या. परत केलेल्या साड्यांचा तहसील कार्यालयात अक्षरशः खच दिसून आला. त्यातून भाजपा यांसह मित्र पक्षाबद्दल श्रमिक कष्टकऱ्यांत किती रोष आहे, हे दिसून आले. तद्नंतर कार्यकर्त्या उल्काताई महाजन यांनी टाइम्सजवळ आगामी लोकसभेबद्दल कठोर भाष्य केले. भाजप, मित्र पक्षाच्या उमेदवाराचा पाडाव करण्याचा आमचा निर्धार आहे, तसे भारत जोडो अभियानातून वैचारिक मोहीम सुरू आहे, असे सांगत तटकरे त्यावेळी संविधानाच्या बाजूने होते, म्हणून आम्ही मदत केली, आता तटकरे यांच्या उमेदवाराला आमचा विरोध असणार असे महाजन यांनी एका प्रश्नावर सांगितले. लोकसभा मतदारसंघात कष्टकरी, श्रमिक आदिवासी समाजाची मोठी ताकद आहे, ही ताकद तटकरेंविरोधात गेल्यावर तटकरेंना मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे समोर आल्याने नेमके काय होणार ? असे आता चोहोबाजूने बोलले जात आहे. दरम्यान, शेकडो कष्टकरी महिलांनी सरकारच्या रोषार्थ साड्या परत केल्याने भाजपा, मित्र पक्षाविरोधात किती संताप आहे, हे अधोरेखीत झाले तर तटकरे सावधान, असेच सध्यास्थितीत वातावरण असल्याचे ठळकपणे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *