आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डीपटू छत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र राज्याचे माजी कबड्डी कॅप्टन  कै. विजय बाबुराव म्हात्रे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

Share Now

187 Views

रोहा (सुहास खरीवले) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डीपटू छत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र राज्याचे कॅप्टनकै. विजय बाबुराव म्हात्रे यांचे निधन गुरुवार १४ मार्च रोजी झाले. त्यानिमित्ताने गावदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसईच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोन मिनिटं उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच फोटोला फुले अर्पण करण्यात आली. गावदेवी क्रीडा व युवक मंडळाचे मुख्य प्रवर्तक महादेव वामन म्हात्रे गुरुजी यांच्या उपस्थितीत मंडळाचे सर्व पदाधिकारी, भातसई गावांची कमेंटि व आजी माजी खेळाडू उपस्थित होते.

हरिश्चंद्र खरीवले यांनी श्रद्धांजली मांडताना विजय म्हात्रे याची आपल्या मंडळा सोबत आसलेल्या परिचय कसे तयार झाले या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले, महादेव म्हात्रे गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करताना विजय म्हात्रे हे कबड्डीपटू कसे तयार झाले. त्याकडे संयम, शिस्त, खेळावर अभ्यास, व्यायाम करणे याच्यावर जस्त भर असायचा त्यांचे वडील बाबुराव म्हात्रे हे सुद्धा मुंबई येथील नामवंत संघात खेळ होते. विजय म्हात्रे मध्ये रेल्वे पहिल्यादा खेळत होते त्यानंतर ते महेंद्र अँड महेद्रा संघातुन खेळत होते. त्यांना शिव छत्रपती पुरस्कार मिळाले होते. तसेच अंतरराष्ट्रीय कबड्डीचा प्रचार प्रसार करण्यासाठी निवड झाली होती.

मोरेश्वर खरीवले यांनी आपले मनोगत व्यक्त पाळी पोटलज संघात बरोबर कसे जिंकलो पहिला नंबर तसेच वारळ मध्ये पहिला नंबर विजय मिलवला, दिनकर पोळेकर कबड्डीपटू कशाप्रकारे पकड करायला पाहिजे यांचे शिकवण विजय म्हात्रे कडुन शिकाव, संजय खरीवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझी कोंकण रेल्वे मध्ये व सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये निवड झाली त्याच्या मुळे सात वेळा नॅशनल खेळु शकलो,लिलाधर थोरवे आपले मनोगत व्यक्त करताना माझी रायगड जिल्ह्यातील संघात निवड झाली होती विजय म्हात्रे महादेव म्हात्रे यांच्या मुळेच मी प्रगती करू शकलो विजय म्हात्रे यांच्या निधनामुळे बोर्जे,भातसई, महाराष्ट्र राज्य नाही देशावर कबड्डीपटू वर शौककळा प्रसरळी आहे. या शौक सभेसाठी ग्रामस्थ अध्यक्ष लिलाधर खरीवले, माजी सरपंच गणेश खरीवले, सुरेश कोतवाल, सुहास खरीवले, परशुराम थोरवे, बळिराम थोरवे,किसन कोतवाल, रुपेश खरीवले, हेमंत खरीवले, निवास खरीवले, भरत कोतवाल विळास खरीवले व गावदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसईचे आजी माजी खेळाडू,ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *