महाराष्ट्र कोळी महासंघ रोहा तालुका अध्यक्षपदी सचिन चोरगे तर महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ सायली चोरगे यांची नियुक्ती

Share Now

322 Views

नागोठणे (याकूब सय्यद) सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र कोळी समाज संघटनाची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या रोहा तालुका अध्यक्ष पदी सचिन नामदेव चोरगे व रोहा कोळी तालुका अध्यक्ष महिला आघाडी पदी सायली सचिन चोरगे यांची दिनांक २२/०३/२०२४ रोजी मनशक्ती केंद्र लोणावळा या ठिकाणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रमेश दादा पाटील आमदार विधान परिषद यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले रोहा तालुका कोळी समाजातील लोकांसाठी अनेक समस्यांमध्ये सहभाग घेऊन गोरगरीब आपल्या कोळी बांधवांना न्याय देण्याचा रात्र दिवस प्रयत्न करणारे रोहा येथील पडम गावातील सचिन नामदेव चोरगे तसेच त्यांच्या पत्नी सौ सायली सचिन चोरगे यांची कामाची दखल घेत महाराष्ट्र कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य नवी मुंबई अध्यक्ष माननीय श्री रमेश दादा पाटील कार्याध्यक्ष माननीय प्रकाश बोबडी सरचिटणीस राजहंस टपके यांनी कोळी महासंघावर निवड केली आहे श्री सचिन नामदेव चोरगे सौ सायली सचिन चोरगे यांच्या या निवडीची बातमी रोहा तालुक्यात सर्वत्र पसरताच कोळी बांधवांकडून तसेच त्यांचे मित्र मंडळी व सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचे वर्षा होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *