रोहा शहरावर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर,२९ महत्वाच्या ठिकाणी लवकरच बसणार सी सी टी.व्ही कॅमेरे

Share Now

187 Views

रोहा (महेंद्र मोरे) रोहा शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा नेहमीच दक्ष असते. आता यावर अधिक भर पडणार असून शहराच्या प्रत्येक महत्वाचे ठिकाण, चौक यांवर आता रोहा पोलिसांचा तिसरा डोळा दिवसरात्र नजर ठेवणार आहे. शहराचे सर्व प्रमुख प्रवेशद्वार, चौक, मंदिरे, बस स्थानक, शाळा, दवाखाने अश्य महत्वाच्या २९ ठिकाणी लवकरच सी सी टी.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे संकल्पनेतून राज्य शासनाच्या माध्यमातून ही अत्याधुनिक यंत्रणा लवकरच रोहा शहरात कार्यान्वित होणार आहे. याद्वारे कोणतीही घटना घडल्यावर याद्वारे तात्काळ आवश्यक ती माहिती पोलिसांना उपलब्ध होत पुढील कारवाई करणेकामी मदत होईल असा विश्वास ही माहिती देताना रोहा पोलिस निरिक्षक देविदास मुपडे यांनी व्यक्त केला आहे. ही यंत्रणा उभारण्यात येत असताना शहरातील नागरिकांनी सहकार्य करत यामध्ये ही यंत्रणा यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सूचना कराव्यात असे आवाहनही त्यांनी रोहे अष्टमी मधील नागरिकांना केले आहे.

रोहा अष्टमी नगरपरिषद नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून बसवलेली सी सी टीव्ही यंत्रणा नेहमीच चर्चेत राहिली. यंत्रणा आहे पण कॅमेरे बंद अश्या या दिखावा असणाऱ्या सेवेचा पोलिसांसह नागरिकांना कोणताच उपयोग होत नव्हता. चोरी लूटमार आदी घटन घडल्यावर हा प्रश्न समोर यायचा त्यावेळी आम्ही ठेकेदाराल पत्रव्यवहार केला आहे तो लवकरच यंत्रणा सुरळीत करेल असे उत्तर नगरपरिषद प्रशासन देत होते.अखेर रायगड पोलिसांनी स्वतःच यंत्रणा उभारत आपल्यालाच नियंत्रणाखाली ती कार्यान्वित करण्याचा निर्धार केला. जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी गृहमंत्रालया कडून यासाठी निधीची उपलब्धता करत अखेर सुरक्षित रोहा शहर ही सी सी टीव्ही योजना मंजूर केली. या योजनेत रोह शहरात २९ ठिकाणी स्वतंत्र पोल उभे करत त्यावर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.यामध्ये नवरत्न हॉटेल बायपास,दमखाडी सागर डेअरी, नदि संवर्धन गार्डन, वैकुंठ धम स्मशान भूमी, रोहा प्राईड हॉटेल, अष्टमी नाका, जुन मच्छि मार्केट जिजामाता भवन,तिनबत्ती नाका,फिरोज टॉकीज,जाफर येरुणकर घर बायपास रोड, बंदर पक्टी, रोहा पोलिस स्टेशन रोड, धावीर मंदिर रोड, रोहा बस स्थानक मागे आशीर्वाद बार, स्व. जनार्दन शेडगे रिक्षा स्टॅंड,जेष्ठ नागरिक हॉल,नगरपालिका चौक, रायकर पार्क कमान, कोर्ट रोड, स्व. माई जगताप रोड. नाना शंकरशेट रोड, नेहरू नगर शाळा, श्रीकृष्ण चौक अंधार आळी, राजाभाऊ आवळस्कर मार्ग,म.सी.गांगल हायस्कूल, गांगल मेडीकल, कोकोनट शॉप, हनुमान टेकडी रोड, मोरे आळी धावीर चौक, भाटे वाचनलय चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर बाजारपेठ, जामा मस्जीद चौक, राम मारुती चौक या ठिकाणी एकत्र येण्याऱ्या रस्त्यांच्या संख्येनुसार कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या यंत्रणेवर रोहा पोलिस स्टेशन मधून नियंत्रण ठेवण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *