रोहा तालुका कुणबी समाज नवीन तालुका कार्यकारणी निवडीसाठी सभा शिवराम शिंदे अध्यक्ष यांच्या उपस्थित संपन्न झाली

Share Now

103 Views

रोहा (वार्ताहर) कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर चणेरा विभाग, धाटाव विभाग, कोलाड विभाग, ऐनघर विभाग, नागोठणे विभाग, सोनगाव विभाग, मेढा विभाग, आरे विभाग, खांब, कुडली विभाग, गोपाळवड विभाग, सर्व कुणबी समाज ग्रुप मधिल कार्यकरणी मधून तालुका कार्यकारणी निवडीसाठी सभा घेऊन अध्यक्ष म्हणून श्री रामचंद्र सकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सरचिटणीस म्हणून सतीश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच मारुती खांडेकर,अनंत थिटे, राजेंद्र शिंदे, रघुनाथ करंजे, गुणाजी पोटफोडे, संतोष खेरटकर, यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच शशिकांत कडू, यशवंत हळदे, मारुती मालुसरे, यांची सहचिटणीस बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सुहास खरीवले यांची खजिनदार बिनविरोध निवड करण्यात आली. शंकरराव म्हसकर माजी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष यांनी समाज संघटनेचे ध्येय धोरणे कस्य प्रकारे नवीन कमेटीने राबवावी या विषयावर मार्गदर्शन केले सुरेश मगर रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष यांनी जुन्या केमेंटीने ज्या प्रमाणे कुणबी भवन त्यांच्या कार्यकाळात पुर्ण केले शिवराम शिंदे यांनी सर्वांना सोबत घेऊन रोहा तालुक्यातील समाज संघटना टिकून ठेवली आहे. नविन कमेटीने यांच्या पुढे समाज कसा एक संघ राहील तसेच समाजातील विविध समस्याचा निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शकर भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाज भवन उभारण्यात आलेल्या अडचणी कशा प्रकारे दुर केल्या आपण एक संघ राहीलो तर आपण रोहा तालुक्यात समाजीक प्रश्न सोडवू शकतो.

यावेळी रोहा तालुका अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मला समाज सेवा करण्यासाठी तेरा वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले त्या वेळी सर्व समाज बांधवांनी सहकार्य केलेत त्याबद्दल मी आभारी आहे.यापुढे हि समाज सेवा करत राहीन. नविन अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मी समाज एकसंघ ठेवण्यासाठी वचन देतो माझ्याकडून समाज हितासाठी कामे करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळीअमित मोहिते, महेश बामुगडे, दत्ताराम झोलगे, निवास खरीवले, खेळु ढमाल, पांडुरंग कडू, दिलिप आवाद, नरेंद्र सकपाळ, गिजे भाऊसाहेब, मोरेश्वर खरीवले, मुरलीधर ठमके, बाबुराव बामणे, रामचंद्र चितळकर, गणेश खरीवले केशव भोकटे, यशवंत मुंढे, प्रकाश शिंदे, विजय पवार, ज्ञानेश्वर दळवी, परशुराम भगत, राम तेलंगे, भाई बामुगडे व कुणबी समाज तालुका कार्यकारणी सदस्य उपस्थित संपन्न झाली.
,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *