स्पंदन नाट्यसंस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन, स्पंदनमुळे मुलांवर चांगले संस्कार होतात सामाजिक कार्यकर्ते : राजेंद्र जाधव

Share Now

147 Views

रोहा : (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या कळागुणांना वाव मिळावा म्हणून शहरात येतात. रोहा शहरातील एकमेव स्पंदन संस्था अशी आहे कि, ती संस्था राज्यात बालराज्य नाट्य निमित्ताने पहिला व दुसरा क्रमांक गेली दहा बारा वर्षे मिळवीत आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांचे राहणीमान, वागणे, व्यवहारिक ज्ञान याबाबत, एकमेकांची मदत करणे असे चांगले संस्कार मुलांवर होताना दिसतात. असे विधान सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी केले. रविवारी सायंकाळी १४ एप्रिल रोजी स्पंदनच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते डॉ. सी. डी. देशमुख हायस्कुलच्या मैदानावर बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, स्पंदन नाट्य संस्था अध्यक्षा स्नेहा अंबरे, सचिव प्रतीक राक्षे, मेहंदळे हायस्क्यूलचे शिक्षक नारायण पानसरे, शेणवई शाळेचे मुख्याध्यापक रमेश दडवे, अलका नांदगावकर, विशाल दंडगव्हाळ, विद्या घोडींदे आदीसह स्पंदनचे बालकलाकार व प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पंदन नाट्य संस्थेच्या माध्यमातून रोहा तालुक्यात रिदम डान्स अकॅडमी, ड्रीम एक्टिंग स्कुल, मॉर्डन प्ले ग्रुप, वेस्टर्न डान्स अभ्यासक्रमसहित शिकवीला जातो. नाटक, पथनाट्य, डान्स यामध्ये स्पंदनच्या मुलांमध्ये नेहमीच चांगलेपणा दिसून आला. यामागे स्पनंदन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे व सचिव प्रतीक राक्षे यांची खुप मेहनत आहे. म्हणूनच आज स्पंदनचे कलाकार आज मराठी सिरीयल, चित्रपट व नाटकात काम करताना दिसून येतात. रोहात झालेल्या स्पंदनच्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्पंदनच्या कलाकारांनी चांगले नृत्य करत प्रेक्षकांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *