डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात NEET UG -२०२४ परीक्षेचे आयोजन

Share Now

127 Views

प्रतिनिधी (उद्धव आव्हाड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांनी NEET UG २०२४ ची परीक्षा घेण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे या विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.कारभारी काळे आणि कुलसचिव प्रा. डॉ. अरविंद किवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे नियोजन होत आहे.

दिनांक ०५ मे २०२४ रोजी या विद्यापीठात परीक्षा आयोजित करण्यात आली असून सुमारे १३०० विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत या परीक्षेची पूर्वतयारी व परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याकरिता विद्यापीठ प्रशासन आवश्यक ती दक्षता घेऊन कार्यवाही करत आहे. या परीक्षेकरिता विविध ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी होणार असल्याने तसेच हे विद्यापीठ ग्रामीण भागात असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांना आवाहन करण्यात येते की महाड आगार, माणगाव आगार, गोरेगाव आगार, रोहा आगार यांनी विद्यापीठापर्यंत येणारी बस सेवा नियमित व वेळेवर येतील याची काळजी घ्यावी जेणेकरून विद्यार्थी परीक्षा केंद्रात वेळेवर पोहोचतील. तसेच सदरची परीक्षा शांततेत पार पाडण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ व परिसर येथे आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा पुरवण्याची विनंती गोरेगाव पोलीस ठाणे यांना करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *