आज ४ जुन मतमोजणीला काहि तासांत सुरुवात होणार, रायगडचे भाग्यविधाते कोण ? हे अवघ्या काहि तासांत ठरणार..!

Share Now

130 Views

रोहा (दिपक भगत) लोकसभा निवडणुक २०२४ चे बिगुळ देशभरात वाजल्यानंतर निवडणुक आयोगामार्फत पाच टप्प्यात या निवडणुका घेण्यात आल्या. आरोप-प्रत्यारोप, टिका-टिप्पणी, जाहिरनामे, विकासकामे यावर प्रामुख्याने हि निवडणुक गाजली. काहि राजकिय नेत्यांनी तर आपण किती जागांवर विजयी होणार याचा स्वंयघोषित निकालपण लावुन टाकला. कोण किती लिड घेणार, कोण कोणाला पाडणार याची चर्चा संपुर्ण देशभरात सुरु असताना रायगड जिल्हा मागे कसा राहणार. तटकरे कि गीते या एकाच मुद्यावर महिनाभर चौका-चौकात चर्चा सुरु होती. काहिनी शब्दिक पैजा लावल्या तर काहिनी ठामपणे सांगितल कि यावेळी तटकरेच येणार…! यावर प्रतिस्पर्धी शांत राहिला तर नवळच त्यानेही मग यावेळी गीतेच येणार..! अस ठामपणे सांगितल. आज अखेर या चर्च्यांना पुर्णविराम मिळणार आहे.

तटकरे कि गीते सरतेशेवटी आज निकाल लागणार. परंतु एकंदरीत राज्याच्या राजकारणासह जिल्ह्याच्या राजकारणावर तटकरेंची असलेली उत्तम पक्कड, मंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि नव्याने झालेल्या भाजप-शिवसेना (शिंदे गट) -राष्ट्रवादी युती याचा होणारा फायदा, या युतीमुळे काहि अंशी मुस्लिम समाज नाराज असल्याचे बोलले जात होते परंतु अस असले तरी मुस्लिम समाजाचा ब-यापैकि मतरुपी कौल हा तटकरेंना असल्याचे उघड झालेले आहे. त्यामुळे एकंदरीत तटकरेंच पारड जड असल्याची चर्चा रायगडमध्ये रंगताना दिसते. परंतु काहि वर्षापुर्वी नाराज असलेल्या आमदारांची तसेच यावेळि मीच खासदार असा जाहिरपणे सांगणारे धैर्यधील पाटिल यांची मनधरणी करण्यात तटकरे किती यशस्वी झालेत ते या निकालाअंती समजेलच. उलटपक्षी प्रतिस्पर्धी असणारे अनंत गीते यांना यावेळी फुटिच्या राजकारणामुळे सहानभुती मिळेल अस म्हटल जात. तसेच कुणबी समाज हा यावेळी गीतेच्या पाठी ठाम उभा राहिल असा विश्वास काहिंनी व्यक्त केला. भाजप-शिवसेना(शिंदे गट)-राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत नाराजीचा फायदा गीतेंना होईल असा काहिनी अंदाज व्यक्त केला. यासर्व गोष्टिंचा विचार करता आज उमेदवारांप्रमाणेच कार्यकर्त्यांची पण धाकधुक वाढलेली असणार. कार्यकर्त्यांनी आपापल्या साहेबांना लोकांपर्यत पोहचविण्यासाठी किती प्रामाणिकपणे प्रयत्न केले हे आजच्या निकालाने सिद्ध होणार आहे. आश्चर्य म्हणजे काहि अतिउत्साहि कार्यकार्त्यांनी तर निकाल लागण्यापुर्वीच विजयाचे बॅनर लावलेले आहे. त्यामुळे एकंदरीत या अतिउत्साही कार्यकर्त्यांकडुन आज कोणत्या साहेबांच धाटामाटात विसर्जन होणार हे पाहणे आता महत्वाच ठरणार आहे. आज कोणाच भाकीत खर ठरणार ? विजयाचा गुलाल कोण उडवणार ? रायगडचे भाग्यविधाते कोण ठरणार ? तटकरे कि गीते कोण सर्वाधिक लीड घेणार ? हे अवघ्या काही तासांत कळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *