प्रवाशान्नो सावधान रोहा बस स्थानकात प्रवाशाना बसण्यासाठी असलेल्या बाकांची स्थिती अत्यंत धोकादायक..!

Share Now

244 Views

रोहा (दिपक भगत) ग्रामिण भागात लालपरी म्हणुन ओळखल्या जाणा-या बसला १ जुन रोजी ७५ वर्षे पुर्ण झाली. गेली ७५ वर्षे ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता नित्यनेमाने सर्वसामान्यांना अविरत सेवा देत राहिली. यापुढेही देत राहिल यात काहि शंका नाही. गरीबांपासुन श्रीमंतांपर्यत,ना जात मानली, ना धर्म कोणाचा धर्म पाहिला सर्वांना समान सेवा देणारी बस न थकता खेडोपाडी पोहचली. त्यामुळे ख-या अर्थाने सामाजिक अभिसरणांचा वस्तुपाठ या बसने आपल्या जन्मापासुन घालुन दिलेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाहि.

शाळेय विद्यार्थी-विद्यार्थींनींपासुन, दिव्यांग, विविध पुरस्कार प्राप्त पत्रकारांपासुन आता नव्याने सुरु केलेल्या अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरीक व महिला अशा तीस पेक्षा जास्त घटकांना शासनाने एसटीच्या माध्यमातुन विविध सवलती दिलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत एसटी हि सर्वसामान्यांसह अनेक घटकांसाठी आपलीशी वाटलेली आहे. अनेक वर्षापासुन कळकट मळकट जीर्ण झालेल्या बस स्थानक ईमारती,चिखलमय झालेला बसस्थानक परीसर, स्वच्छतागृहामधील दुर्गंधी अस्वच्छ बसेस यामुळे विटाळलेल्या प्रवाशाना मन प्रसन्न कराणारा प्रवास घडवा यासाठी अनेक उपाययोजना महाराष्ट्र परीवहन महामंडळामार्फत राबविल्या जातात.

परंतु नुकतीच रोहा तालुक्यातील बस स्थानक या अनेक प्रवाशांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी सपशेल अपयशी ठरल्याच पहावयास मिळत आहे. रोहा तालुल्यातील प्रवाशाना बसण्यासाठी असलेल्या बाकांची दयनिय अवस्था पाहिल्यावर सर्वसामान्यांना प्रश्न पडावा हिच का ती अविरत सेवा देणारी बसस्थानक ? जिथे नागरिकांना अनेक त्रासांपासुन आराम मिळावा म्हणुन प्रशासन कडक उपायोजना राबवतो. मग प्रवाशांचे बसण्याचेच हाल होणार असतील तर आता नेमक बसाव ते कोठे ? असा प्रश्न प्रवाशांना पडतोय. कामधंद्यातुन, धावपळीतुन निवांतपणे बसची वाट बाकावर बसुन पहावी तर तेहि सुख रोहा तालुक्यातुन ईतरत्र प्रवास करणा-या प्रवाशांच्या नशिबी नाहि. तसेहि रोह्यात अनेक प्रश्न नागरिकांना सतावतात त्यात आणखी एकाची भर. त्यामुळे सलाम रायगडच्या माध्यमातुन सर्व प्रवाशांना कळकळीची विनंती कि,प्रवाशन्नो सावधान..! रोहा बस स्थानकातील बाकांची अवस्था फार नाजुक असुन त्यावर बसताना विशेष काळजी घ्या, नाहितर ती बाकं कधी तुम्हाला त्यांच्या मिठित घेऊन तुम्हाला दवाखान्याची वाट दाखवतील हे सांगता येत नाहि.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *