उरण (विठ्ठल ममताबादे) शनिवार दि २९ जून रोजी झालेल्या रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था पेण-च्या पंचवार्षिक निवडणुकीत एम. एन. पाटील सहकार पॅनल ने पॅनल प्रमुख नरसु पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली १५ पैकी १५ संचालक प्रचंड मतांनी निवडून आले असून विजयाची हॅट्रिक साधली आहे. तसेच सभासदांना वेळेवर कर्ज पुरवठा करणे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे, विविध विकासात्मक कामे, मयत झालेल्या सभासदांना विमा योजना, अद्ययावत ऑनलाइन वर्गणी व हप्ते भरण्याची सुविधा त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यात आर्थिक सहकार्य केल्याने तसेच सभासदांना वेळेवर कायमनिधी. डिव्हिडंड, भेटवस्तू आणि व्याजदर कमी करणे अशा गोष्टीमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व सभासद बंधूंनी एम एन पाटील सहकार पॅनलवर प्रचंड विश्वास दर्शवून सर्वच्या सर्व १५ संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे. काही विरोधकांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. जाणून बुजून आपले उमेदवार उभे करून पतसंस्थेत शिरकाव करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. उलट पक्षी विरोधकांची डिपॉझिट जप्त झाली आहेत. या निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख नरसू पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय आर के म्हात्रे. बीपी म्हात्रे, के पी पाटील, राजेंद्र पवार सुरेश पालकर, जी. एम. पाटील,उत्तम कडवे प्रदिप मुरूमकर माळी सर, बाबा गडगे, बाबा गोळे, श्रीमंत वाघमारे, शिवाजी माने इत्यादी मार्गदर्शक, सल्लागार आणि प्रत्येक शाळेतील माननीय मुख्याध्यापक सर्व सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य करून मेहनत घेतली आहे. भविष्यात पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी एम एन पाटील सहकार पॅनल आणि सर्व संचालक कटिबद्ध राहतील असे त्यांनी अभिवचन दिले आहे. या प्रचंड मोठ्या विजयामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
विजयी उमेदवार- संचालक
१.श्री.रविंद्र बाबू वाघमारे
२.श्री.रमाकांत बाळाराम गावंड
३.श्री.अनिल तुकाराम अंबावले
४.श्री.राजेंद्र बाजीराव पालवे
५.श्री नरेंद्र अनंत मोकल
६.श्री.दिनेश रामचंद्र नागे
७.सौ.सुषमा अनंत भोपी
८.सौ.किरण रामनाथ चव्हाण
९.श्री.रविंद्रसिंग सत्तर सिंग गिरासे
१०.श्री.शहाजी अरुण बेरे
११.श्री.राजेश जयसिंग गोळे
१२.श्री.संतोष बाबाजी कासारे
१३.श्री.नितीन दत्तात्रेय म्हात्रे
१४.श्री.गणेश नारायण पवार
१५.श्री.संजय गोपीनाथ जाधव