रोहा (दिपक भगत):- लायन्स क्लब रोहा यांच्यावतीने रायगड जिल्हा परिषद शाळा लांढर येथील विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. लायन्स क्लब रोहा यांचे मराठी शाळा,अंगणवाड्या तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि भौतिक सुविधा पुरविण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.रोहा तालुक्यात त्यांच्या या सामाजिक कार्याचा नेहमीच गौरव करण्यात आलेला आहे.लायन्स क्लब रोहा यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळा लांढर येथील विद्यार्थ्यांना दप्तर व वह्याचे वाटप करण्यात यावे. हा कार्यक्रमाच्या रा.जि.प प्राथमिक शाळा लांढर येथे घेण्यात यावा यासाठी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाशी सतिश भगत यांनी नुरुद्दीन रोहावाला व अध्यक्ष ममने साहेब यांचा कडे विशेष मागणी केली होती.लायन्स क्लब रोहाने देखील सतीश भगत यांच्या मागणीची दखल घेत लांढर येथील मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला.तसेच या कार्यक्रमांसोबत या लहान वयातील विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची आवड निर्माण होण्यासाठी वृक्षारोपण करीत “झाडे लावा,झाडे जगवा” असा संदेश देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजविला.
या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. समन्वय समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव भगत यांनी पहिले अध्यक्ष राठी सर व बारदेशकर साहेब सचिव यांच्या जुन्या आठवणीना उजाला दिला. ग्रुप ग्रामपंचायत वाशीचे माजी सरपंच सतिश भगत यांनी ग्रामीण भागातील मुलांची गरज ओळखुन लायन्स क्लब रोहा यांनी केलेल्या सहकार्य बद्दल आभार मानले. तसेच रोहा तालुक्यामध्ये नुरीशेठ हे व्यक्तीमत्व गेले कित्येक वर्ष कसे उत्तम काम करततात यांचा आढावा दिला.शाळा ISO नाममंकीत आहे या शाळेला मदत करताना आनंद वाटतो आहे. लायन्स क्लबच्या कामाचा आढावा संपदा देशपांडे मॅडम यांनी दिला. विद्यार्थी यांचे चेहऱ्यावर आनंद दिसुन आला पुढे हे ऋणानुबंध असेच काम चालु रहावेत हि इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपदा देशपांडे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे नुरुद्दीन रोहावाला, जुमाना रोहावाला, अनधा माने, सुस्मिता शिट्यालकर, वर्षा सातपुते, तसेच लांढर गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे माजी समन्वय समिती अध्यक्ष शंकरराव भगत, माजी उपसभापती रोहा तालुका अनिल भगत, माजी वाशी ग्रामपंचायत सरपंच सतीश भगत, शाळा कमिटी अध्यक्ष गितेश भगत, पोलीस पाटील लक्ष्मण जंगम,नारायण चितळकर,शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य, तसेच रा.जि.प. शाळा मुख्याध्यापिका पवार मॅडम, पाटील सर,सर्व शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत सदस्या दिपाली धामणसे, आशासेविका प्रियांका टेंबे, प्रदिप जाधव, भरत भगत, जयवंत नांदे, पालकवर्ग,युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.