रायगड भूषण हरेश्वर ठाकूर विशेष सन्मान पत्राने सन्मानित

Share Now

56 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या कडून रायगड जिल्हा पोलीस ग्राउंड अलिबाग येथे आपदा मित्र, नागरी संरक्षण दल मधील पदाधिकारी कर्मचारी व विविध स्वयंसेवकांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल ‘विशेष सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे उरण मधील सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर ठाकूर यांचाही सन्मान करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण मंत्री मा. आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते हरेश्वर ठाकूर यांना आपदा विशेष सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. ह्या अगोदर ही रायगड भूषण पुरस्कार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते हरेश्वर ठाकूर यांना मिळाला होता.या प्रसंगी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे व अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रविंद्र शेळके व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सदर रायगड जिल्हा सन्मान पुरस्कार हा आपत्ती परिस्थितीमध्ये पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करणे, शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ले तसेच शासन आपल्या दारी महाड येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रणाचे प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल हरेश्वर ठाकूर यांना मा. मंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. आपदा मित्र, नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवक ते जिल्हाधिकारी कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढा मोठा विशेष सन्मान पत्र हा सन्मानित प्रवास पूर्ण करण्यासाठी मला अनेकांची मोलाची साथ लाभली. या प्रवासात प्रशासकीय अधिकारी उद्धव कदम ( तहसीलदार उरण तालुका ), रायगड जिल्ह्याला, विकासाला नावारूपाला आणले ते विद्यमान कोकण आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांची प्रेरणा हि फार मोलाची आहे. विद्यमान जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण किसन ना. जावळे यांनी आमच्या कार्यावर दाखवलेला विश्वास हा महत्त्वपूर्ण आहे. आपदा परीवाराचे सर्वांत हक्काची व्यक्ती म्हणून नेहमी ज्यांच्या कडे पाहिलं जाते ते सागर पाठक {आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड जिल्हा} यांनी वेळोवेळी दाखवलेला विश्वास, मार्गदर्शन, मनोहर म्हात्रे {राष्ट्रपती पदक प्राप्त} ह्यांनी शिष्य म्हणून आम्हाला दिलेलं ज्ञान, आज आम्ही समाजापर्यंत निस्वार्थी भावनेने पोहचवत आहोत. या सर्वांचे मी नेहमी ऋणी आहे. अशी भावना हरेश्वर ठाकूर यांनी याप्रसंगी व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *