आ. भरत गोगावले यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आमदारांच्या पाठीशी महिलांनी उभे रहावे : ज्योती ठाकरे 

Share Now

1,266 Views

महाड (दीपक साळुंखे) आ. भरत गोगावले यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आमदारांच्या पाठीशी महिलांनी आगामी निवडणुकीत उभे रहावे असे आव्हान महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्योती ठाकरे यांनी महाड शहरातील विरेश्वर मंदिर सभागृहात आयोजित शिवसेनेच्या प्रथम ती महिला संमेलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्योती ठाकरे, आ. भरत गोगावले, युवासेना अधिकारी विकास गोगावले, सिनेट सदस्य शितल देवरुखकर, महिला संपर्कप्रमुख मुंबई महानगरपालिका न्याय व विधी समितीच्या सुवर्णाताई करंजे, जिल्हा संघटक अनिता पवार, उपजिल्हा संघटक दिपा पाटील, राजीप सदस्या निकिता ताठारे, अमृता हरवंडकर, मैथिली खेडेकर, माजी सभापती सपना मालुसरे, माजी उपसभापती सिद्धी खांबे , तालुका महिला संघटक प्रतिभा पवार, माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, वैशाली भूतकर, माजी राजिप सदस्या सुषमा गोगावले यांच्यासह तालुक्यातील महिला सरपंच, लोकप्रतिनिधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.         

पुढे बोलताना ज्योती ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेना प्रथम ती महिला संमेलन संकल्पना राबवत असून महिलांचा विकास करण्यासाठी शिवसेना पक्षाने शिक्षण सुरक्षा, स्वास्थ्य, स्वावलंब आणि समता या पंचसूत्री काम करण्याचे योजले आहे. या उद्देशातून महाडमध्ये प्रथम ती महिला संमेलनात महिलांच्या अलोट गर्दी लाभली असून आगामी विधानसभा निवडणुकीत आ. भरत गोगावले यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींच्या पाठी महिला मतदारांनी ठामपणे उभे रहावे असे आव्हान ज्योती ठाकरे यांनी केले. तर आ. भरत गोगावले यांनी आपल्या घणाघाती भाषणात लवकर झोपणाऱ्या व उशिरा उठणाऱ्या आमदाराला महाड विधानसभेच्या जनतेने घरी पाठविले असून लवकर उठून उशिरा झोपणाऱया व कार्यकर्त्यांना महत्त्व देणाऱ्या आमदाराला संधी दिली असल्याने आपला विजय निश्चित असून अब की बार तीस हजार बारचा नारा दिला आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आपले शिक्षणावर व लोकांच्या सुख दुःखात सहभागी होत असल्याने टीका केली जात होती. मात्र या टीकेला जनतेने मतपेटीतून उत्तर दिले. 

शिवसेनेच्या महिला संमेलनाला जमलेली गर्दी ही टीका करणाऱ्या विरोधकांना चोक उत्तर असल्याचे मत आ. गोगावले यांनी व्यक्त केले. महिलांच्या समस्या सोडविण्याकरिता त्यांचा भाऊ म्हणून आपण कटीबद्ध असल्याचे आ. गोगावले यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटक सपना मालुसरे यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी गांधी यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार वैशाली भूतकर यांनी मानले. महाड शहरांमध्ये विरेश्वर मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या प्रथम ती महिला संमेलनास महिलांनी अलोट गर्दी केली होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मेळाव्यात झालेली महिलांची गर्दी ही आ. भरत गोगावले यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी गर्दी असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *