समुद्र किनाऱ्याचे विद्रुपीकरण करण्यात मानव हे पुढे ; नम्रता कासार 

Share Now

946 Views

मुरुड (अमूलकुमार जैन) सागर हा मनाला आनंद देणारा आहे. मात्र त्याचे विद्रुपीकरण करण्यात मानव हे पुढे आहेत. सागर किनारा हा स्वच्छ ठेवला तर पर्यटकांची संख्या वाढेल. समुद्र किना-याची स्वच्छता अगदी आठवडयातून एकदा केली तरी आपल समुद्र किनारा स्वच्छ राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन मुरूड तालुक्यतील काशीद ग्रामपंचायत सरपंच नम्रता कासार यांनी आयोजित कार्यक्रमात केले. 

रोहा तालुक्यतील धाटाव येथील सॉल्वे स्पेशालिटीज कंपनी आयोजित काशीद समुद्र किनारा आणि परिसर स्वछता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी काशीदचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमित खेडेकर, प्रकाश कासार, ग्रामविकास अधिकारी अविनाश पिंपळकर, सॉल्वे कंपनीचे हेड ऑफ ऑपरेशनचे मोहित जलोटे, ऑपरेशन मॅनेजर वैभव शिर्के, ईएचएस ऑफिसर राजेश हजारे, एचआर मॅनेजर विजय चौगले, एचएस मॅनेजर सतीश कुलकर्णी, मॅनेजर प्रदीप नंदी, बिपीन घरत, सातपुते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *