जेएसडब्ल्यूच्या लोखंडी कच्चा माल मुद्यांवर प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा, वाहतूकीला शिस्त लागणार ? सर्वांचे लक्ष 

Share Now

1,066 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा यांसह जिल्ह्यातील बहुचर्चित लोखंडी कच्चा माल वाहतुकीला परवानगी नेमकी कोणाची, शिवसेना, विभागीय सरपंच, ग्रामस्थांनी जेएसडब्ल्यूच्या लोखंडी कच्चा माल वाहतुकीवर बंदी आणावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली, सबंध विभागात लोखंडाच्या भुकटीने होणारे वायू, जल प्रदूषण, रस्त्यांची दुर्दशा प्रकरणावर सडेतोड भूमिका घेणाऱ्या स्थानिक पत्रकारावर वाहतूकदारानी केलेली अरेरावी सर्वच मुद्यांवर रोह्याचे नवे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांच्याशी गुरुवारी पत्रकारांनी चर्चा केली. त्यावर क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, माल झाकून नेणे, रस्त्यांची दुरुस्ती, विभागात सीएसआर फंड वापरण्याबाबत तसेच वाहतूकदारांची अरेरावी खपवून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करीत कार्यवाहीबाबत ठोस आश्वासन प्रांताधिकारी डॉ. माने यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, जेएसडब्ल्यूच्या लोखंडी कच्चा मालवाहतुकीवर नियमान्वये निर्बंध आणणार असे नवनिर्वाचित प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी पत्रकारांना सांगितल्याने आता वाहतुकीला खरच शिस्त लागते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पेण येथील प्रख्यात जेएसडब्ल्यूला लागणारा लोखंडी कच्चा माल हा रोहा रेल्वे यार्डात उतरविला जातो. मूळात जेएसडब्ल्यूला पेण रेल्वे यार्ड नजदीक असताना कच्चा माल रोहा यार्डात का उतरविला जातो, रोहा ते पेण  दूर अंतरावरून वाहतूक का केला जाते ? हा संशोधनचा विषय आहे. त्यावर पेणवासियांनी वायू व जल प्रदूषणाच्या कारणास्तव लोखंडी भुकटी उतरविण्यास विरोध दर्शविल्याचे अप्रत्यक्ष समोर आले. त्यामुळे तब्ब्ल दोनतीन वर्षानंतर पुन्हा रोहा रेल्वे यार्डात जेएसडब्ल्यूचा माल उतरविला जाऊ लागला आणि समस्यांचा विळखा विभागात  पुन्हा भयानक जाणवू लागला. लोखंडांच्या भुकटीने पिंगळसई, मालसई, धामणसई यांसह सबंध विभागातील सामाजिक स्वास्थ बिघडले.  रस्त्यांची पूर्णतः वाट लागली. माल वाहतूक करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. त्याच जेएसडब्ल्यूचा रोहा नागरपरिषद हद्दीत माल उतरविणे, त्यासाठी रोहा नगरपरिषदेची एनऒसी नाही, असे खुद्द मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितल्याने यामागे नेमका कोण, माल वाहतुकीच्या  वाटाघाटीत सर्वश्रुत बडा नेताच असल्याची चर्चा सुरु आहे. याच घडामोडीत लोखंडी माल वाहतूक वाटाघाटीचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांवर सबंधित ठेकेदाराने अरेरावी केल्याची घटना घडली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे, त्या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी पत्रकारांनी नवे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांची भेट घेतली. चर्चेत कार्यवाहीबाबत ठोस आश्वासन डॉ. माने यांनी दिल्याने आधीच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या लोखंडी कच्चा माल मुद्यांवर गांभीर्याने दखल घेतली जाईल ? अशी अपेक्षा आता व्यक्त झाली आहे. 
       
जेएसडब्ल्यूच्या लोखंडी कच्चा माल वाहतुकीभोवती मोठे राजकारण आहे. राजकारणातील किंगमेकर बड्या नेत्याने मोजक्या पदाधिकाऱ्यांना वाहतूक ठेका दिला. सीएसआर फंड विभागातील सार्वत्रिक कामावर वापरण्यावर जाणिवेतून भर नाही. ग्रामपंचायत विकासकामांवर जेएसडब्ल्यूला मदत दयावी असे प्रयत्न होत नाहीत, याची सरपंच, ग्रामस्थांतून स्पष्ट नाराजी आहे. लोखंडी कच्चा मालाची भुकटी आम्ही सहन करायची जल वायू प्रदूषण सहन करायचे, रस्त्यांची वाट लावून घ्यायची याच संतापातून शिवसेना व सरपंचानी तहसीलदार रोहा यांना वारंवार निवेदन दिले. लोखंडी कच्चा माल वाहतुकीला परवानगी आहे का, नगरपरिषदेची परवानगी नाही, त्यावर तहसील प्रशासनाने महिन्याभरात काहीच कारवाई केली नाही, निवेदनावर खुलासा नाही, त्यामागे नेमके गौडबंगाल काय ? याच बहुचर्चेत ठेकेदाराने पत्रकाराजवळ अरेरावी केली आणि जेएसडब्ल्यूच्या कच्चा माल मुद्यांनी वेगळे वळण घेतले. लोखंडी कच्चा माल उतरविणे, वाहतूक करणे, अरेरावी सर्वच मुद्यांवर नवे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांची भेट घेतली. चर्चेत डॉ. माने यांनी शिवसेना, सरपंचांचे निवेदन, पत्रकारांची भूमिका समजून घेतली, रस्ता दुरुस्ती, सीएसआर फंड यावर डॉ. माने यांनी गांभीर्याने दखल घेतली, तर वाहतूकदारांची अरेरावी खपवून घेणार नाही, सर्व मुद्यांवर तातडीने कार्यवाही करणार, असे ठोस आश्वासन प्रांताधिकारी डॉ. माने यांनी दिल्याने आता नेमकी काय कारवाई होते ? याचीच चर्चा सध्या सुरु आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *