श्रीवर्धन मतदारसंघात युती तुटण्याचा ‘ शुभारंभ’, शिवसेना भाजपाला बसणार फटका ?

Share Now

1,716 Views

अलिबाग (प्रतिनिधी)  राज्यात भाजपा सेनेची युती होणार कि नाही ? याचीच चर्चा असतानाच अपेक्षीतपमाणे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मुख्यतः भाजपाकडून युती तोडण्याचे स्पष्ट संकेत मिळाले भाजपाचे महत्वकांक्षी उमेदवार कृष्ण कोबनाक यांनी भाजपच्या उमेदवारीवर ठोसपणे हक्क बजावले. शिवसेनेने उमेदवारीतून माघार घेऊन ही जागा भाजपाला सोडावी असे कृष्णा कोबनाक यांनी जाहीर आवाहन केले. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघाचा पारंपरिक दावा असलेल्या शिवसेनेची भूमिका काय राहील याच चर्चेत शिवसेना  भाजपच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप सेनेची युती न झाल्यास मुख्यतः अलिबाग, श्रीवर्धन मतदारसंघात सेना भाजपाचे उमेदवार स्वातंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील, मात्र युती झाल्यास सर्व तयारीनिशी सज्ज झालेले श्रीवर्धन भाजपाचे कृष्ण कोबनाक, अलिबाग भाजपाचे ऍड. महेश मोहिते काय पवित्रा घेणार ? हे समोर येणार आहे. दरम्यान, श्रीवर्धन मतदारसंघात युती तुटण्याचा शुभारंभ झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपा स्वतंत्र लढण्यास भाजपा यांसह सेनेच्याही उमेदवारीला मोठा फटका बसणार, सेने भाजपाच्या संघर्षात राष्ट्रवादी शेकाप आघाडीच्या उमेदवाराला मोठा फायदा होणार ? हीच चर्चा सध्या श्रीवर्धन, अलिबाग विधानसभा राजकारणात सुरु आहे
 
राज्यातील भाजपा सेनेची युती तुटेल ? यापेक्षा युती तोडण्याची घाई रायडगातील अलिबाग, श्रीवर्धन विधानसभा मतदारसांघातील भाजपाच्या महत्वकांक्षी उमेदवारांना झली, हे लपून राहिले नाही अलिबाग मतदारसांघात भाजपा वाढविला, सरकारच्या माध्यमातून गाव, विभागाचे विकास साधले, त्यामुळे मतदार आपल्याला पसंती देईल, पक्षासाठी खूप मेहत केली असा दावा अलिबाग मतदारसंघातील भाजपाचे इच्छूक उमेदवार ऍड.महेश मोहिते यांनी करून उमेदवारीवर ठाम असल्याचे वारंवार ठासून संगितले प्रसंगी आणीबाणीत अपक्ष उमेदवारीला सामोरे जाऊ असा सज्ज इशारा ऍड महेश मोहिते यांनी  दिल्याने सेनेच्या संभाव्य उमेदवार महेंद्र दळवी यांच्यासाठी अवघड जागी दुखणे झाले, दुसरीकडे श्रीवर्धन मतदारसंघातील  भाजपाचे कृष्णा कोबनाक आधीपासूनच उमेदवारीच्या तयारीत आहेत. तसे प्रचार प्रसार श्रीवर्धन, रोहा, तळा, माणगांव सर्वत्र आधीच सुरु आहे. युती होवो न होवो निवडणूक लढविणार असा विडा कोबनाक यांनी उचलला. तसे पत्रकारांना  नेहमीच सांगितले. त्यानूसार कोबनाक यांनी युती मान्य नाही म्हणत उमेदवाराची इच्छा व्यक्त केल्याने सद्यस्थितीत भाजपा सेनेची युती तुटण्याचे स्पष्ट संकेत मिळाले त्यामुळे राज्यात सेना भाजपाची अधिकृत युती झाल्यावरही अलिबाग मतदारसंघातून भाजपाचे ऍड.महेश मोहिते श्रीवर्धनमधून भाजपाचे कृष्णा कोबनाक अपक्ष उमेदवारी लढवितात का ? युती झाल्यास सेनेची काय भूमिका राहील ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शेकाप आघाडीकडून आदिती तटकरेंची उमेदवारी निश्चित झाली. त्या ३ ऑक्टोबरला उमेदवारी दाखल करतील असे सूत्रांनी सांगितले. याउलट अलिबाग मतदारसंघातून  शेकाप राष्ट्रवादी आघाडीचे पंडित पाटील, पेणहून शेकाप राष्ट्रवादी आघाडीकडून धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारी नावाची घोषणा आधीच झाली. पेणमधून भाजपा सेना युतीकडून रवी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र युती न झल्यास पेणमधील सेनेची काय भूमिका राहील ? याचीच जोरात चर्चा आहे. युती झल्यास पेणमधील शिवसेनेचा विरोध हा अलिबाग, श्रीवर्धन मतदारसंघातील भाजपाच्या बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेत शिरतो का ? हे पाहावे लागणार आहे. युती झाल्यावरही अलिबागमधून भाजपाचे ऍड. महेश मोहिते, श्रीवर्धनमधून भाजपाचे कृष्णा कोबनाक बंडखोरी करणं हे जवळपास निश्चित झाल्याने सेने भाजपाची ताकद विभागली जाऊन श्रीवर्धन राष्ट्रवादी आघाडीच्या आदिती तटकरे, अलिबागमध्ये शेकाप आघाडीचे पंडित पाटील यांना  मताचे किती नवस मिळते ? हे निकालातून स्पष्ट होईल तरीही भाजपाचे ऍड. महेश मोहिते, कृष्णा कोबनाक भाजपा सेनेची युती झाल्यास बंडखोरी करतात का ? हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान, भाजपा सेनेची युती होण्याचे शनिवारी पुन्हा एकदा स्पष्ट संकेत मिळाल्याने जिल्ह्यातील सेना, भाजपाची युती अभेद्य राहते का ? त्यातून बहुचर्चित त्या बंडखोरांवर काय कारवाई होईल ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *