श्रीवर्धन विधानसभेसाठी शिवसेनेकडून अखेर विनोद घोसाळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब ? तब्बल २४ वर्षानंतर तटकरे विरुद्ध घोसाळकर ‘सामना’

Share Now

3,152 Views

श्रीवर्धन (प्रतिनिधी) श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांचे आव्हान कोण पेलणार ? या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळण्याचे अधिकृत संकेत प्राप्त झाले. श्रीवर्धन विधानसभेसाठी शिवसेनेकडून अखेर उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या वृत्ताला रविवारी दुजोरा मिळाला. सेना भाजपाची युती निश्चित होणार, श्रीवर्धन विधानसभेची जागा पारंपरिक सेनेकडे आहे.याच शक्यतेतून सेना भाजपा युतीकडून सेनेचे पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे यांनी उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नावावर प्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले. सेनेचे संभाव्य उमेदवार विनोद घोसाळकर यांनी रविवारी सायंकाळी रोहा मतदारसंघात अधिकृत दौरा केला. तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या निवासस्थानी सेनेचे संभाव्य उमेदवार विनोद घोसाळकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान, श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे पर्यायाने तटकरे विरुद्ध सेनेचे विनोद घोसाळकर असा सामना तब्बल २४ वर्षानंतर पाहायला मिळणार आहे त्यात मुख्यतः तटकरे विरुद्ध घोसाळकर कोण बाजी मारणार ? यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.        

राज्यातील महत्वाच्या विधानसभांच्या निवडणुकांना केवळ २० दिवस राहिले आहेत. तरीही सेना भाजपा युतीचा तिढा सुटत नाही. पितृपक्ष संपला तरी जागा वाटप नाही. त्यामुळे जिल्हातील मुख्यतः सेना भाजपाच्या महत्वकांक्षी उमेदवारांचा जीव टांगणीला लागला. त्यातच रायगड भाजपाचे नेतेगणांनी सातही जागांवर हक्क सांगत तशी तयारी केल्याचे स्पष्ट आहे. अलिबाग मतदारसंघातून भाजपाचे ऍड.महेश मोहिते, श्रीवर्धन मतदारसंघातून भाजपाचे कृष्णा कोबनाक प्रसंगी अपक्षही लढतीसाठी सज्ज आहेत. सेना भाजपाची युती न झाल्यास भाजपाचे इच्छूक उमेदवार काय भूमिका घेतात ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रीवर्धनसाठी राष्ट्रवादीकडून आदिती तटकरेंच्या नावाची घोषणा झाली. त्यांच्या विरोधात सेनेकडून अनिल नवगणे, ऍड.राजीव साबळे, रवी मुंढे, प्रमोद घोसाळकर, समीर शेडगे कोणाला उमेदवारी मिळते ? या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. राष्ट्रवादी आघाडीच्या आदिती तटकरे यांच्या विरोधात सेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. केवळ घोषणा बाकी आहे, अशी माहिती अधिकृतपणे रविवारी समोर आली. खा. सुनिल तटकरे यांचे सेनेचे विनोद घोसाळकर यांचा पारंपरिक राजकीय हार्डवैर आहे. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभेची लढत अप्रत्यक्ष सुनिल तटकरे विरुद्ध घोसाळकर अशीच राहणार असल्याचे जोरदारपणे बोलले जात आहे. 
         
श्रीवर्धन विधानसभेसाठी सेनेकडून विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे भाजपचे महत्वकांक्षी उमेदवार कृष्णा कोबनाक उमेदवारी मागे घेतात का, सेना भाजपाची युती झाल्यास कोबनाक यांची काय भूमिका असेल, त्यातच सेनेचे विनोद घोसाळकर यांच्या उमेदवारीला सेनेतून सर्वमान्य पसंती असेल का ? अशी नवी चर्चा आता सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरेंना श्रीवर्धन मतदारसांघातून तब्बल ३८ हजारांहून आघाडी राहिली. ती आघाडी तोडण्याचे काम सेना, भाजपाचा उमेदवाराला करावे लागणार आहे. श्रीवर्धनमधून एमआयएमचे असंमल कादरी उमेदवार राहणार असल्याच्या वृत्ताने मुस्लिम मतांच्या विभागणीचा फायदा सेनेला कितपत मिळतो ? हेही  पाहावे लागणार आहे. सेना भाजपाच्या युतीत एमआयएमच्या मतांच्या विभागणीचा फायदा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना कितपत महागात पडतो ? हे सुद्धा अधोरेखीत होणार आहे. विनोद घोसाळकर यांचा मुख्य मतदारसंघ मुंबई दहिसर आहे. २००९ च्या विधानसभेत ते निवडून आले. तर २०१४ च्या सेना भाजपाच्या स्वतंत्र लढतीत भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी घोसाळकर यांचा दारुण पराभव केला. याच घोसाळकर यांनी १९९५ च्या जुन्या रोहा माणगांव विधानसभा निवडणुकीत सुनिल तटकरें विरुद्ध उमेदवारी लढविली होती. त्यात घोसाळकर यांचा केवळ  ४ हजार ५०० च्या फरकाने पराभव झाला होता. आता तब्बल २४ वर्षानंतर तटकरे विरुद्ध घोसाळकर असा सामना सबंध जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारतो ? याची उत्कंठा अधिक वाढली. दरम्यान, सेनेचे संभाव्य उमेदवार विनोद घोसाळकर यांनी रविवारी उशिरा रोहा दौरा केला. तर आता सेना, भाजपाची युती होते का, श्रीवर्धन मतदारसंघात भाजपाची बंडखोरी काँग्रेसची भूमिका कोणाच्या पथ्यावर पडते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *