संतांचे आशीर्वाद लाभदायक ठरतील : आ. भरत  गोगावले 

Share Now

1,238 Views

महाड (वार्ताहर) संतांचे आशीर्वाद लाभदायक ठरतील असे प्रतिपादन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले यांनी केले आहे. महाड तालुक्यातील रामवाडी नागाव छगन राम महाराज कोकण निरांत आश्रम येथे रविवार 6 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय संत प.पु. श्री आबाराम महाराज महाराज पुण्यतिथी सोहळा प्राथमिक आरोग्य शिबीर तसेच दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गुरुवर्य श्री डायाभाई महाराज, प्रजापती रावजी राममहाराज, आनंद राममहाराज कदम, नामदेव महाराज, सकपाळ निरांत आचार्य श्री महादेव महाराज घाग, सीताराम बारकु कदम, विठोबा कदम, रवींद्र मोरे , माजी सभापती सीताराम कदम, माजी राजिप सदस्य नीलेश ताठरे, जालिंदर मोरे, विभागप्रमुख अनंत सावंत आदी मान्यवरांसह कोकण निरांत सांप्रदाय मंडळ रामवाडी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना आ. भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये संतांचे आशीर्वाद आपल्याला लाभदायक ठरतील  असा विश्वास व्यक्त करून विज्ञान युगामध्ये सुखी जीवन जगण्याकरिता अध्यात्माची जोड असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. संतांचा सहवास लाभल्याने ईश्वराची कृपा दृष्टी नक्कीच होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन करून विजयाची हॅट्ट्रिक करणार असल्याचा दावा आ. गोगावले यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *