श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरेंच्या अडचणींत वाढ ? 

Share Now

1,958 Views

श्रीवर्धन (प्रतिनिधि) जिल्ह्यातील महत्वाच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शनिवारी अर्ज छाननीच्या दिवशी शिवसेना महायुती विरुध्द राष्ट्रवादी  आघाडीत आक्षेपाचे जोरदार राजकीय नाट्य घडले. प्रारंभी राष्ट्रवादिकडून महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर, प्रमोद घोसाळकर यांच्याविरोधात उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याचे गंभीर आक्षेप घेण्यात आले.विनोद घोसाळकर हे कोकण म्हाडाचे सभापती म्हणून शासकीय लाभाचे पद भूषवित आहेत, पदाचा राजीनामा न देताच निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यात आले, असा आक्षेप राष्ट्रवादीचा होता. त्या आक्षेपाला सेना महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे ह्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत, हे पदही शासकीय लाभाचे आहे असे म्हणत विनोद घोसाळकर यांनी आदिती तटकरेंच्या उमेदवारी अर्जालाही दमदार आक्षेप घेतले. महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरेंच्या अर्जावरील सूनावणी शनिवारी उशिरा होऊन दोघांचेही अर्ज वैध ठरल्याची महत्वपूर्ण घटना घडली. त्याच घडामोडीत मुस्लिम  लीग पार्टीचे उमेदवार अकमल कादरी यांनी राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरेंच्या प्रतिज्ञापत्रावरील महितीवर आक्षेप घेतल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मुख्यतः शिवसेना महायुती विरुद्ध राष्ट्रवादी आघाडीत प्रमुख लढत आहे. याच मतदारसंघातून खा. सुनिल तटकरेंना तब्बल 38 हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आदिती ततकरेंचा विजय निश्चित आहे, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुखकर विजयासमोर महायुती यांसह मित्रपक्ष अपक्ष उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केHल्याचे चित्र आहे. श्रीवर्धन मतदारसंघातील सेनेच्या नेत्याला उमेदवारी  मिळालेली नाही. नुकतेच सेनेत गेलेल्या माजी आ.अवधूत तटकरेंनी थेटपणे उमेदवारी नाकारली. यामागे नेमके राजकारण काय, आमचं ठरलंय असे नाही ना, आशा अनेक उलथापालथीत शिवसेनेकडून इच्छूक उमेदवार जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रवी मुंढे, राजीव साबळे यांना उमेदवारी मिळाली नाही. दहिसर मतदारसंघाचे माजी आ. विनोद घोसाळकर यांना तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा तटकरेंविरुद्ध रणांगणात उतरविले. तरीही उमेदवार घोसाळकर यांना मतदारसंघातील शिवसैनिकांनी स्विकारले, एवढेच काय ? बंडखोरी करणाऱ्या भाजपाने ऐनवेळी बंडाची तलवार म्यान केली. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी होऊन काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने राष्ट्रवादीच्या एकतर्फी विजयात मोठे अडथळे निर्माण झाले. महायुतीची ताकद समोर आल्याने महायुती विरुद्ध आघाडीत कडवी झुंझ होणार? याच चर्चेत राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरेंविरोधात मुस्लिम लीगचे अकमल कादरी यांनी कायदेशीर आव्हान स्विकारल्याने काय होणार ? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

श्रीवर्धन मतदारसंघात महायुती विरुद्ध आघाडीच्या आक्षेप लढाईत मुस्लिम लीगचे अकमल कादरी यांनी उडी घेतली. आदिती तटकरे यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या सर्वच गुन्हांची माहिती नाही, असा अकमल कादरी यांनी घेतला. आदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पेण  पोलीस ठाण्यातील गुन्हाचीच माहिती दिली. रोहा पोलीस ठाण्यातील गुन्हयाची माहिती लपविल्याचा आरोप कादरी यांनी केला. कादरी यांच्या नव्या हरकतीवरून आदिती तटकरेंच्या अडचणीत वाढ झाल्याच्या वृत्ताने राष्ट्रवादीच्या गोटात काही काळ शांतता पसरली होती. त्या आक्षेपांवर शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली आणि सायंकाळी उशिरा निकाल देत उमेदवार आदिती तटकरे यांच्यावरील आक्षेप फेटाळून लावल्याचे समोर आले. मूळात शिवसेना महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आदिती तटकरे या दोघांचेही अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामुळे मुख्यतः राष्ट्रवादीने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र आदिती तटकरें च्या गुन्हा माहिती संबंधी सुनावणीच्या निर्णयाचे अकमल कादरी यांचे समाधान झाले नाही. ताटकरेंचा अर्ज वैध ठरविल्यानंतर या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात लगेचच याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी रविवारी सलाम रायगडला सांगितले. राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरेंविरुद्ध उच्च न्यायालयातयाचिका दाखल करण्याचा स्पष्ट दावा अकमल कादरी यांनी केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम राहतो की  बदलला जातो, नेमके काय घडले, आदिती तटकरेंच्या अडचणीत वाढ झाली का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रारंभी महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रवादीवरच नवा डाव उलटला. त्यामुळे आता राष्ट्रवादीला प्रत्यक्ष लढाईत कोणाकोणाशी सामना करावा लागेल ? हे पाहावे लागणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.