नांदगाव समुद्रकिनारी बिबट्या वाघाचा वावर

Share Now

2,105 Views

मुरूड (अमूलकुमार जैन) मुरूड तालुक्यतील नांदगाव येथील समुद्र किनारी बिबट्या जातीच्या वाघाच्या पायाचे ठसे सापडले असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. फणसाड अभयारण्य हा मुरूड तालुक्यतील काही गावलगतच आहे. या फणसाड अभयारण्यात जंगली पशु प्राण्यांचे वास्तव्य आहे. अनेकवेळा हे प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीमध्ये आलेल्या घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत. ह्या प्राण्यांनी अनेक वेळा मानवी वस्तीमध्ये येऊन दहशत निर्माण केलेली आहे. मात्र बुधवारी रात्रीच्या सुमारास नांदगाव गावापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या फणसाड अभारण्यात असणारा एक बिबट्या वाघ हा जंगलाबाहेर आला होता. बिबट्या वाघ हा समुद्रकिनारी फेरफटका मारल्या असल्याचे त्याच्या पायाच्या पंजावरून ग्रामस्थांच्या लक्षात आले.      

नांदगवचे माजी उपसरपंच राजेश साखरकर, मुरूड तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी तातडीने मुरूड वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना ह्याबाबत कल्पना दिली. माहिती मिळताच प्रशांत पाटील आणि त्यांचे कर्मचारी हे समुद्रकिनारी आले आणि त्यांनी त्या ठसाच्या निरीक्षण करीत सदर ठसा हा बिबट्या वाघाचा असल्यानचे त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. प्रशांत पाटील यांनी शैलेश दिवेकर, संजय गाणार यांच्या सहाय्याने पीओपीद्वारे बिबट्या वाघाच्या पायाच्या पंजाच्या ठसाचे नमुने घेतले. प्रशांत पाटील यांनी सांगितले की सदर बिबट्या हा रस्ता चुकून समुद्रकिनारी आला असेल. मात्र हे त्याच्या लक्षात येताच तो जंगलाकडे गेला आहे. कारण त्याच्या पावलांचे ठसे हे जंगल भागाकडे जाण्याच्या दिशेने सापडले आहे. तरी त्यांनी नांदगाव ग्रामपंचायतीला सावध राहण्याचे आव्हान केले आहे. तसेच ग्रामस्थांना सावधगिरी म्हणून दवंडी देण्याची सूचना ही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *