मॅरेथॉनवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी रुग्णांना मदत करा, डॉक्टर तुम्ही सुद्धा ! सृजन रोहेकरांची प्रतिक्रिया

Share Now

930 Views

रोहा  (महेंद्र मोरे) मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांतील मॅरेथॉनचे फॅड आता जिल्हा यांसह रोहासारख्या ग्रामीण शहरामध्ये सुरु झाल्याचे सर्रासपणे दिसून येत आहे.वर्षभरात विविध संस्था, राजकीय लोकांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या. किमान दोन तीन स्पर्धा झाल्या. त्या मॅरेथॉन स्पर्धांची चर्चा न संपताच पुन्हा जिल्ह्यातील डॉक्टरांनी रोहा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. समाजसेवेचा वसा घेतल्याचा आव आणणाऱ्या काही क्लब, संस्था यांच्यानंतर आता डॉक्टरांनीच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याने आधी जिल्ह्यातील रुग्णांना सढलहस्ते  मदत करा अशी प्रतिक्रिया सृजन रोहेकरांनी अप्रत्यक्ष व्यक्त केली. दरम्यान, मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत रोहेकरांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर्स असोसीएशनने जाहीर केला आहे.        

मॅरेथॉन स्पर्धेची जोरदार पंचतारांकित तयारी सुरु झालेली दिसत आहे.स्पर्धेच्या आयोजनावर लाखो रुपये खर्च केला जातो. स्पर्धेवरील खर्च काही बडे हॉस्पिटल व औषधी कंपन्यांच्या माध्यमातून होणार असल्याचे वेगळे कोणी सांगण्याची गरज नाही. एकीकडे आधी पैसे भरा नंतरच उपचार व औषधे मिळणार असे फलक लावून काम करणाऱ्या डॉक्टरांनी मॅरेथॉनचे आयोजन न करता याच लाखो रुपयांतून गरीब गरजूंना वैद्यकीय उपचार देण्यासाठी केला असता तर निश्चितच अनेकांना याचा आधार मिळाला असता असेही काहींनी सांगितले. कॉर्पोरेट क्लबच्या नादाला लागून ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा असेच मॅरेथॉनवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या डॉक्टरांबद्दल बोलले जात आहे. यातून सामाजिक जाणिवेचे डॉक्टर्स बोध घेतील ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *