कालव्याच्या सफाईत पाटबंधारे खात्याची दिरंगाई, करोड़ोंचा खर्च, नियोजन शून्य

Share Now

1,043 Views

रोहा (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनाखालील कालवे झाले माळ रान, पाणी नसल्याने झाडे झुडपं माती घनकचरा भरल्याने शेतकरी चिंताग्रस्त, ईडा पीड़ा टळो बळीचे राज्य येवो। ही म्हण आता भात कोठार म्हणून इतिहासात जमा झालेल्या रायगडातुन हद्दपार झाल्याची चिन्ह दिसत आहेत. शेतीला सोडाच मानवी स्वच्छता गुंरढोराना मागील सात ते आठ वर्षा पासून कोलाड़ पाठबंधारे अभूत पूर्व पुई पुगांव खांब वगळता नडवली चिल्हे देवकान्हे मालसाई धामणसई निडी अष्ठमी तसेच आंबेवाड़ी किल्ला लांढर निवी भूवनेश्वर आशा गावांना पाणी नाही, अद्याप कालव्याची सफाई देखील नाही त्यात देखील मोठी दिरंगाई पाणी येईल की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे,त्यामुळे याबत पाणी वापर संस्था रोहा माणगांव यांची सिंचनपूर्व हंगामा 2019/20च्या आढावा बैठक ही मागील नोव्हेंबर महिन्यात जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि रोहा माणगाव नागोठणे कोलाड देवकान्हे धामणसई निवी धाटाव किल्ला आंबेवाडी या विभागातील पाणी वाटप संस्थांचे पदाधिकारी यांच्या समावेत पार पडली मात्र यात मोठा गदारोल निर्माण करुण कालव्याचे अर्धवट काम पूर्ण करा मगच शेतकऱ्यांना पाणी द्या असा आग्रह यावेळी कोलाड़ पाठबंधारे विभागीय कार्यकारी अभियंता यांना केला.

साफसफाई व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना मुबलक पाणी देऊ मात्र यावर पाठबंधारे खाते कोणतीही दुरुस्ती अथवा सफाई करत नसल्याने पाणी वापर संस्थेच्या पदाधिकार्यानी याविषयाची नाराजी व्यक्त करत या सिंचनावरील कुण्डलीकेचा उजवा तीर व डावा तीर हे दोन्ही कालवे गेली सात ते आठ वर्ष अर्धवट कामांमुळे कालवे पाझरत असल्याने येथील शेतकऱ्यांचे झालेली नुकसान भरपाई पाठबंधारे विभागाने द्यावी अशी जोरदार आक्रमक भूमिका घेत संपूर्ण कालव्याच्या बांधकामासाठी केलेला खर्च या खर्चाचा आजपर्यंत बळीराज्याला त्याचा उपभोग मिळाला नाही उन्हाली पिक तर सोडाच परंतु पावसाली पिक देखील या कालव्याच्या पाझरामुळे बळीराजा घेऊ शकला नाही त्यामुळे पाठबंधारे खात्याच्या अड़मुठे पनाच्या धोरणामुले आज रायगडातील रोहा तालुक्यातील नडवळी, चिल्हे, देवकान्हे, मालसई, धामणसई, निडी अष्ठमी, तसेच आंबेवाड़ी, किल्ला, धाटाव, वाशी, लांढर, नीवी, या भागांतील बळीराजा अक्षरश उध्वस्त झाला तसेच केलेले काम देखील निकृष्ट दर्जाचे त्यातच उंदीर घुशी खेकडे यांनी पोखरण काढली आसल्याच्या भावना यावेळी व्यक्त करत पोट कालवे व मोऱ्या व त्यावरील गेट अद्याप बसले गेले नाहीत तर ते बसविण्यास कोणती अडचण निर्माण होत आहे असा सवाल यावेळी केला.

सिंचनातून उजवा तिर डावा तिर लगत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेपूर पाणी मिळाले त्यातूनच ते भात पीक घेत सुखी आणि समाधानाने जगत होते मात्र 2011/12 मध्ये सरकारी धोरण म्हणून हे कालवे शेतकऱ्यांकडून दुरुस्ती साठी घेण्यात आले असून कुंडलीकेच्या सिंचनातून उजवातीर म्हणून 1ते 8 पुई पुगांव खांब या मधे सुकेली आंबाखोरे सुकेली नागोठणे सह व्यावसायिक यांना पाणी वापर होतो 9 ते 29 हा नडवळी देवकान्हे मालसई निडी अष्ठमी आशा शेतकऱ्यांना या सिंचनातून पाणी वापर होतो डावा तीर यामधुन 1ते 10 कोलाड़ चिंचवली तिसे माणगाव 1ते20 रोहा यामधे आंबेवाड़ी किल्ला वाशी निवी भुवनेश्वर असा समावेश आहे 1ते 33 तिसे धरणाची वाडी मोर्बा माणगाव शाखा माणगाव 1ते5 गोरेगाव शाखा माणगाव शाखेत वडपाले टेमपाले यांचा देखील यामध्ये समाविष्ट आहे, रोहा माणगाव या शाखेच्या कालवा दुरुस्ती करता 2008/9 या साली जागतिक बँकेनी पाणी वापर संस्था स्थापन करून 4 कोटि चे टेंडर या कमाकरता काढले हे टेंडर त्यांनी जलसंपदा विभाग वाइज शाखांच्या कामाकरता काढले पाठबंधारे विभागातून लोकांचा सहभाग घेण्यासाठी पाणी वाटप संस्था स्थापन करण्यात आली जेणेकरून सिंचनाचा कारभार हस्तगत करून पाणी वाटप संस्थेने हा कारभार संभाळावा या अटीवर निधी उपलब्ध करून दिली व टेंडर देखील पास झाले मात्र या निधिचा वापर अर्धवट कामांमुळे झाला नाही तद नंतर पुन्हा मास्टर कंट्रक्शन ने तब्बल 18 कोटीचे टेंडर पुन्हा जागतिक बँकेकडून पास करून घेतले या मधे कुंडलीकेच्या उजवा तीर तसेच 1ते 8 मोर्बा शाखा 1ते 20 रोहा शाखा 9ते20 अष्ठमी शाखा या विभागावाइज मिळालेले टेंडरच्या पैशातून काम सुरु करण्यात आले या टेंडर मधे महत्वाचे बांधकाम लाइनिग आणि भराव या कामा करिता हे टेंडर होते मात्र मास्टर कंस्ट्रक्शन ने सगळे जुने बांधकाम तोडून ठेवले मात्र काम करण्यास ते आपत्र ठरले असून तेही टेंडर बरखास्त झाले नंतर राज्य सरकारच्या मंत्री मंडळातून जलसंपदा खात्यातून 2011/12 साली कालवा नुतनी करण्यासाठी रोहा शाखेसाठी उजवा तीर डावा तीर यासाठी 28 कोटि तर माणगाव शाखे साठी 62 कोठी रूपयांची तरतूद व मंजुरी करून राज्य सरकाच्या वतीने टेंडर काढण्यात आले यामध्ये प्रामुख्याने उजवा तीर देवकान्हे मालसई निडी अष्टमी शाखा 14 कोटि व् रोहा डावा तीर आंबेवाड़ी किल्ला नीवी 14कोटि तर माणगाव करिता 62 कोटि कोलाड़ चिंचवली तिसे वरसगाव मोर्बा गोरेगाव टेम पाले वड पाले ह्या कामाकरता टेंडरची विभागनी करून 2011साली याची मंजूरी देखील आली आणि 28 कोटीचे टेंडर भापकर यांना दिले तर 62 कोटीचे टेंडर आर के मदानी यांना दिले गेले.

सदर काम ठेकेदारानी सुरु देखील केले माणगाव मोर्बा 1 ते 10 व 1ते 32 या अंतराचे पानी 1982 साली 29 की मि अंतरापर्यन्त जात होते परन्तु कोट्यावधी रूपये खर्च करून हे पानी फक्त 10 ते पंधरा किलो मि अंतर पार करत आहे तर वडपाले टेम पाले या कालव्यात पानीच पोहचत नाही त्या मुले 62 कोटीची कामे काय झाली असा सवाल यावेळी माणगाव शाखेनी केला तर रोहा शाखेवर 28 कोटित देवकान्हे अष्टमी या कालव्याला केलेले कॉक्रेटीकरण हे पहिलाच पावसात वाहून गेले तर आंबेवाड़ी किल्ला वाशी नीवी या कालव्यावर अपुरा निधी असल्यामुळे टेकेदारने हे काम अर्धवट बंद केले तर रोहा शाखेचे उजवा तीर डावा तीर हे दोन्ही कालव्याचे काम गेली पाच वर्ष अर्धवट अवस्तेत शेतकऱ्यांच्या शेतात होत असलेले लीकेज अथवा पझर असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने पानी वापर संस्था यांनी पाणी सोडण्याबात विरोध केला.

कोलाड़ पाठबंधारे विभागाने कलवा मोऱ्यांवर व् लाइनिगवर कोरोडो रूपये खर्च केले तर काही ठेकेदार अर्धवट काम करून पळून गेले तर काही निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्यातच पाठबंधारे विभागाने व्यापार धोरण स्वीकारले त्यांना शेतकरी बळीराजाशी काही घेणे देने नाही दर साल करोड़ो रूपयांचा कंपन्यांकड़ूं पनिपट्टी मलीदा लाटला जातो त्याचा फायदा या विभागला व् सरकारला देखील होतो शेकऱ्यांसाठी श्वासत पाणी पुरवठा होवा म्हणून साऱ्या योजना आल्या मात्र कोणतीही योजनेचा लाभ आजपर्यंत शेतकरी बळीराजाला मिळाला नाही गोवे कोलाड़ धरनाचा प्रश्न ऐरणीवर त्यात पुई पुगांव खांब वगळता तालुक्यातील इतर शेतकरी वर्गासाठी म्हणजे सरासरी 700 ते 800 हेक्टर भातशेती अष्टमी शाखा व् किल्ला निवी शाखा येथील शेती या अभावी उध्वस्त झाली कालव्याला पाणी येत नसल्याने विहीरी तलाव आटले जातात गेली सात ते आठ वर्षात या विभागाकडून कालव्याचा गाल देखील काढला गेला नाही मोर्यांची कामे अर्धवट येत्या काळात काम पूर्ण करून देतो ही शाश्वती गेली सात वर्ष शेतकऱ्यांसाथी फॉल ठरली त्यामुळे येथील ग्रामस्थाना पानी टनचाई चा प्रश्न मोठा निर्माण होत आहे तसेच उन्हाली भात शेती नसल्याने समान्यांची रोजी रोटी हरपली व या कामाबबतचा तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा विचार शासनाने करवा अशी प्रतिक्रिया प्रगतिशील शेतकरी तुकाराम सानप,मारुती खांडेकर व प्रशांत राउत, धनाजी लोखंडे गजानन गायकर, चंद्रकांत लोखंडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *