मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम

Share Now

1,032 Views

पोलादपूर – मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम राहिले चौपदरीकरण कामात होणारा हलगर्जीपणा अपघाताला करांनी भूत ठरत असल्याचे दिसून येत आहे गुरवारी पहाटे 3 च्या सुमारास पोलादपूर हद्दीतील लोहारमाळ जवळ 18 चाकी महाकाय कंटेनर पलटी झाल्याने चालक सचिन भारत चौगुले वय 24 हा जखमी झाल्याची घटना घडली 
या बाबत सविस्तर वृत्त असे कि मुंबई गोवा महामार्गावरून गुरवारी 18 चाकी महाकाय कंटेनर एम एच 46 बी बी 8375  घेऊन चालक सचिन भारत चौगुले रा मंगळवेढा जी सोलापूर सध्या राहणार हातखंबा रत्नागिरी हा मुंबई कडे जात असताना पोलादपूर हद्दीतील लोहारमाळ जवळ आला असता कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने जाग्यावर पलटी झाला य अपघातात चालक सचिन जखमी झाला असून त्याच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले कंटेनरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *