एम्बायो कंपनीकडून प्लॅस्टीक मुक्तीसाठी प्रयत्न सीएसआरमधून पिशव्यांचे वाटप 

Share Now

937 Views

महाड (वार्ताहर) शासनाच्या प्लॅस्टीक मुक्त धोरणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता महाड एमआयडीसीमधील एम्बायो कंपनीकडून पुढाकार घेण्यात आला असून सीएसआर अंतर्गत नागरिकांना कापडी  पिशव्यांचे  वाटप करून पर्यावरणाबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.

महाड तालुक्यातील सवाणे ग्रामपंचायतींमधील शेलटोली येथील हुतात्मा नथू टेकवले स्मारकांमध्ये एम्बायो कंपनीतर्फे  सीएसआर निधी अंतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य व्यवस्थापक किशोर चौधरी, पर्यावरण व सुरक्षा शाखेचे मुख्य व्यवस्थापक  रावसाहेब गीते, सावाना ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश बोबडे, उपसरपंच अनिल जाधव, माजी सरपंच अनिल उतेकर, सुरेश चौधरी, संदेश कदम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

यापूर्वी कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून वॉटर फिल्टर प्लांट तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता शेलटोली येथील प्राथमिक आरोग्य  उपकेंद्रांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी नागरिकांकरिता मोफत औषध पुरवठा तसेच वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनदा तपासणीकरिता उपलब्ध करून दिले आहेत. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये प्लॅस्टीकमुक्त गाव  संकल्प पूर्ण करण्यासाठी सीएसआर निधी अंतर्गत प्लॅस्टीक पिशवीला पर्याय  उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांकडून कंपनी प्रशासनाला धन्यवाद देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *