तब्बल २५ वर्षानंतर सानेगांव नवीन वसाहत ‘उजळली’, ग्रामस्थात आनंदोत्सव

Share Now

667 Views

रोहा (प्रतिनिधी) देशाच्या सत्तरी स्वतंत्र वर्षांनंतर असंख्य वाडीपाड्यात आजही वीज नाही. जिल्हा मुख्यतः रोहा ग्रामीणातही अनेक वाड्या विजेपासून वंचित होत्या. त्यातील दुर्गम इंदरदेव वाडीला अखेर वीज मिळाली. विजेपासून गाव, वाडी दुर्लक्षीत नसल्याची चर्चा असतानाच अलिबाग विधानसभा मतदारसंघ समावेश रोहा तालुक्यातील सानेगांव नवीन वसाहत दबाट आळीत तब्बल २५ वर्षे वीज नव्हती. विजेसाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली. पण त्या मागणीकडे कोणीच लक्ष दिले नाही. विजेचा मुद्दा नेहमीच मतांसाठी झाला, तरीही वीज आली नाही. अखेर खा. सुनिल  तटकरे यांच्या प्रयत्नांतून सानेगांव नवीन वसाहत दबाट आळी विजेच्या प्रकाशाने उजळली, त्यामुळे ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केल्याचे समोर आहे आहे. 

रोहा अलिबाग तालुक्याच्या सीमारेषेवर असलेली सानेगांव नवीन वसाहत दबाट आळीला मागील २५ वर्षे वीज नव्हती. वसाहतीत वीज येण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली. पण त्या मागणीकडे राजकारण्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वसाहतीच्या विजेसाठी प्रयत्न करू असे सांगत अनेक निवडणूका झाल्या, लोकांची मते घेतली, पण वसाहतीच्या विजेकडे कोणीच लक्ष दिले नाही, हि बाब सरपंच स्वप्नाली भोईर, उपसरपंच अपर्णा दिवकर, विभागीय नेते संतोष भोईर, शामित दिवकर यांनी विजेचा विषय खा. सुनिल तटकरे यांच्या कानावर घातला. त्या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला. त्यावर चिंता करू नका, लवकरात लवकर विजेचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन खा. तटकरे यांनी दिले. त्याच प्रयत्नातून अखेर शनिवारी २९ फेब्रुवारी रोजी वसाहत दबाट आळीत वीज आली आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. 

सानेगांव नवीन वसाहत दबाट आळीत वीज आली. वसाहत उजळली. सरपंच स्वप्नाली भोईर, उपसरपंच अपर्णा दिवकर सदस्य संजय राणे, योगेश वाघमारे, तुषार ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून वीज पोल, नवीन विद्युतवाहिनी मिळाली. खा. सुनिल तटकरेंनी विजेचा प्रश्न मार्गी लावला. खा. सुनिल तटकरे यांनी विजेचा प्रश्न मार्गी लावून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना जोरदार चपराक दिली. तर खा. सुनिल तटकरे यांसह वीज महामंडळाचे अधिकारी, ठेकेदार यदुराम धुमाळ यांचे ग्रामस्थांनी आभार मानले, अशी रोखठोक प्रतिक्रिया शामित दिवकर यांनी दिली. दरम्यान, सानेगांव नवीन वसाहत दबाट आळीत वीज आल्याने ग्रामस्थ आनंदित झाले, हे अधोरेखित झाले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *