संतांचे विचार आचरणात आणा , डॉ. बाबासाहेबांनी शिकविलेल्या मार्गावर चला! – जिल्हाध्यक्ष नंदू तळकर यांचे रोहयात प्रतिपादन

Share Now

820 Views

रोहा ( प्रतिनिधी)  जिवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यासाठी मनाची शक्ती एकाग्र करा, थोर संतांचे विचार आचरणात आणा, बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चला, त्यातुनच समाज व देश उभा राहिल असे प्रतिपादन ज्येष्ट विचारवंत आणि चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष नंदू तळकर यांनी विरझोली रोहा येथे केले. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 643 वी जयंती उत्सवात ते बोलत होते. रोहा तालुका चर्मकार संघटना व ग्रामस्थ मंडळ संत रोहिदास नगर विरझोली यांच्या संयुक्त विद्यमाने संत रोहिदास जयंतीउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर चर्मकार समाजाचे जिल्हा सरचिटणीस राकेश केळकर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक आंबडकर, सहचिटणीस दिलीप पाबरेकर, विरझोली सरपंच कु. प्रियांका धुमाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धुमाळ, दामोदर घरटकर, तंटामुमक्त अध्यक्ष भानु देऊ डाके, माजी सरपंच मारुती नाक्ति, जिल्हा प्रतिनिधी सचिन नांदगांवकर, तालुकाध्यक्ष अशोक नांदगांवकर, विरझोली संत रोहिदास समाज मंडळ अध्यक्ष सुनिल पाबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.           

मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाले. जयंती उत्सवाचे औचित्य साधुन समाजातिल विद्यार्थ्यांचे गुणगौरव आणि विशेष सन्मान करण्यात आले. समाजाचे उपाध्यक्ष अनिल नागोठकर यांची कन्या ही बीएचएमस उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. कु. पियुशा अनिल नागोठकर हिचा सन्मान करण्यात आला. महिलांचे हळदीकुंकु समारंभ संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले तरुण विचारवंत राकेश केळकर यांनी मानवता धर्म, शिक्षण आणि संस्कारांचे मुल्य, आई वडिलांची सेवा, अंधरूढी पासून समाज मुक्तता, डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि संत रोहिदास यांचे अभंग, दोहे आदी विचार मांडताना विविध विषयांवरील व्याख्यानाने उपस्थित समाज बांधवांना परखड मार्गदर्शन केले. समाजाचे जिल्हा सहचिटणीस दिलीप पाबरेकर यांनी संत रोहीदास महाराजांचे मौलिक विचार आणि आपला समाज याविषयी मत व्यक्त केले. जिल्हा महीला प्रतिनिधी सौ. विद्या रोहेकर यांनी सूत्रसंचालन केले, त्यांनी संत रोहिदासांच्या जिवनावर प्रकाशझोत टाकली तर तालुका सरचिटणिस गणेश चांदोरकर यांनी आभार मानले. प्रितीभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजाचे सरचिटणिस गणेश चांदोरकर, कार्याध्यक्ष रूपेश नांदगावकर, उपाध्यक्ष समीर नागोटकर, खजिनदार दिलीप भोईरकर, सहचिटणीस राजन बिरवाडकर, सुनील पाबरेकर, संदीप पाबरेकर, दामोदर घोसाळकर, शशांक पाबरेकर, अनिकेत खामगांवकर आदींसह तालुका व विरझोली पदाधिकारी, महिला मंडळ आदि समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *