‘त्या’ पीड़ितेची अखेर शनिवारी उशिरा वैद्यकीय तपासणी, रोहा ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा चर्चेत, घटनेचा कसून तपास सुरु ; पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम

Share Now

1,015 Views

रोहा (राजेंद्र जाधव)  पेण  तेथून कामासाठी आलेल्या सामान्य कुटुंबातील मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना अष्टमीत घडली. या गंभीर घटनेने सबंध समाज प्रक्षोप झाला. सबंधीत  आरोपीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. आरोपीला तात्काळ अटकही करण्यात आली. अल्पवयीन मतिमंद मुलीच्या अत्याचार प्रकरणचा तपास अलिबाग उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्याकडे सोपविला. कदम यांनी जलदगतीने प्रकरणाचा तपास सुरु केल्याचे समोर आले. घटनेच्या मुळापर्यंत पोहचून कसून तपास केला जात आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी शनिवारी सलाम रायगडला दिली. तर अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणाची संबंधित आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी संगितले. दरम्यान, अत्याचारातील पीडित, तिच्या कुटुंबियांना शनिवारी अलिबागहुन माघारी परतावे लागले. पिडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याचे धक्कादायकपणे समोर आले. त्यातून जिल्हा ग्रामीण वैद्यकीय विभागाचे हलगर्जीपणा पुन्हा उघड झाला. या प्रकरणाकडे बड्या लोकप्रतिनिधींनी अद्याप लक्ष घातले नाही. यामुळे पिडितेला न्याय देणाऱ्या तरुणांतुन नाराजी व्यक्त झाली. तर पेणचे आ. रवींद्र पाटील हे रविवारी पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आल्याने ते तरी प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अष्टमीत भाजी पिकवून विकणाऱ्या गरीब कुटुंबातील अल्पवयीन मतिमंद मुलीवर गावातील ५५ वर्षीय इसमाने अत्याचार केले. हि धक्कादायक घटना तब्बल आठवड्यानंतर चर्चेत आली. घटना समजताच अष्टमी रोहातील ग्रामस्थ, तरुण, पत्रकार यांनी आवाज उठवत संबंधीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यातच मतिमंद मुलीने अत्याचार केल्याचे सांगितल्याने शुक्रवारी उशिरा आरोपी करीम नागोठकर यांच्यावर भादवी ३५४, ३५४ अ, (१) (११), ३५४ (बी) बाल  लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ ८,९ (के), १ (एम ), १० प्रमाणे गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात आले. पीडित मुलीच्या अत्याचार तपासाची सूत्रे बाहेरील पोलीस अधिकाऱ्यांना द्यावे, ही मागणी पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी मान्य केली, त्यानुसार अलिबागच्या महिला पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांची लगेचच नियुक्ती झाली. कदम यांनी अत्याचार प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला. आरोपी करीम नागोठकर याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता एकंदर तपासातून काय समोर येते ? याचीच सध्या चर्चा सुरु आहे. तपास अधिकारी सोनाली कदम यांची भेट घेतली असता घटनेचा कसून तपास सुरु आहे. पीडितेवर अन्याय होणार नाही, त्यादृष्टीने अधिक तपास करू, असा ठाम विश्वास कदम यांनी पत्रकरांना दिला. त्यामुळे पीडितेला योग्य न्याय मिळेल ? अशी अपेक्षा व्यक्त झाली. तर पीडित कुटुंबाला पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी अधिक सांगितले. 

पिडितेला वैद्यकिय तपासणीसाठी शनिवारी अलिबाग येथे नेण्यात आले. मात्र जिल्हा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय तपासणी झाली नाही. पिडीत कुटुंबाला माघारी परतावे लागल्याची गंभीर बाबही समोर आली. त्यातून वैद्यकीय विभागाचा हलगर्जीपणा कायम दिसून आला. रोहा ग्रामीण रुग्णालयात प्रारंभी वैद्यकीय तपासणी झाली नाही. खासगी रुग्णालयात तपासणी केली. त्यातून वैद्यकीय अहवाल वेळेत न आल्याने पीडितेवर आधीच अन्याय झाले. आठवड्यानंतरहि पीडितेची वैद्यकीय तपासणी न झाल्याने पुराव्यात अडथळा येवू शकतो. अशा गंभीर प्रकाराकडे अद्याप कोणत्याच लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले नाही. स्थानिक आमदारांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्याचे वृत्त नाही. मात्र पेणचे आ. रवींद्र पाटील, अलिबागचे आ. महेंद्र दळवी पीडित कुटुंबाची रविवारी भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. ते तरी पीडितेची भेट घेतात का, पिडितेला न्याय देण्यासाठी संबंधित यंत्रणेला काय सुचना देतात ? हे पहावे लागणार आहे. शनिवारी आयोजित महिला मेळाव्याला पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे रोहात होते, आ. अनिकेत तटकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी रोहा पोलीस ठाण्याला भेट देउन घटनेची माहिती घेतली. मात्र पालकमंत्री तटकरे , खा. तटकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्याचे वृत्त नाही. त्यामुळे प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. दरम्यान पीडितेची शनिवारी वैद्यकीय तपासणी न  केल्याचे समोर आल्याने त्याची दखल लोकप्रतिनिधी घेतील का ? याची चर्चा सुरु आहे. तर रविवारी पीडित कुटुंबाची कोण लोकप्रतिनिधी भेट घेतात , यंत्रणेला काय सुचना देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *