महिलांओ के सन्मान में, भाजपा मैदान में.. पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी शुक्रवारी रोह्यात निषेध मोर्चा, रोहा पोलीस निरीक्षकांची चौकशी करून कारवाई करावी ; आ. तटकरेंचे गृहमंत्र्यांना पत्र

Share Now

803 Views

रोहा (प्रतिनिधी)  अष्टमी येथे अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना मागील पंधरवड्यात 
घडली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना अनेकदा 
दाबण्याचा प्रयत्न झाला. तब्बल आठ दिवसानंतर रोहा अष्टमी ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर अखेर रोहा पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करणे भाग पडले. त्यातून गुन्हा उशिरा का दाखल करण्यात आले, त्या पीडित कुटुंबाची तातडीने तक्रार का घेण्यात आली नाही, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी खाजगी रुग्णालयात का करण्यात आली, पोलीस कर्मचारी मुख्यतः पीडित कुटुंबावर कोणाचे दबाव होते, संबधीत पोलिसांनी तक्रारी नोंदविण्यात दिरंगाई केली ? असे अनेक धक्कादायक घटनाक्रम समोर आले. त्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढे सरसावलेल्या तरुणांना १४९ अंतर्गत नोटिसा बजावल्या, त्या सर्व घटनेच्या निषेधार्त महिलांओंके सन्मान में, भाजपा मैदान में म्हणत रोहा भाजपाच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी १० वाजता राम मारुती चौक ते तहसील कार्यालय असे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष शैलेश रावकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, अल्पवयीन मतिमंद मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला. त्याबाबत गुन्हा दाखल न करता पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी नातेवाईकांना गुन्हा दाखल करू नका, बदनामी होईल, असे समजूत काढून माघारी पाठविले. पीडितेची वैद्यकीय चाचणीही खाजगी रुग्णालयात केली. त्यातून निरीक्षकाची भूमिका संशयास्पद, कामात कसूर करणारी आहे. तरीही संबंधीत अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आ. अनिकेत तटकरे यांनी गृहमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे केल्याने पोलीस अधिकारी अधिक अडचणीत आल्याचे अधोरेखित झाले आहे.          

पेण येथून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबावर अतिप्रसंग ओढावला. 55 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, ही गंभीर तितकीच, शहराच्या संस्कृतीला धक्का देणारी घटना तब्बल आठ दिवस दाबण्यात आली. मूळात तालुक्याच्या इतरत्र भागातील धक्कादायक घटनाही दाबण्यात  आल्या. मात्र अष्टमीतील घटनेत पीडित कुटुंबातील महिला अतिशय धाडसी बनत पुढे आली. सर्व प्रलोभने  धूड़कावत तरुणांच्या मदतीने आठवड्यानंतर गुन्ह्यासाठी ठाम राहिली. अखेर दबावाचे बिंग फुटले. आरोपी करीम नागोठकर याच्यावर पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल झाले आणि सबंध जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. पीडित कुटुंबाच्या अत्याचार चौकशीसाठी महिला पोलीस अधिकारी नेमण्यात आले. दुसरीकडे अष्टमी रोहेकर ग्रामस्थांत रोष अधिक वाढत होता. पीडित कुटुंबाची तक्रारी का घेण्यात आली नाही, सर्व धक्कादायक प्रकरण पोलीस गांभीर्याने घेत नाहीत, याच चर्चेत पुन्हा गंभीर घटना घडल्या. त्यातील पीडित कुटुंबासाठी पुढे सरसावलेल्या तरुणांना १४९ अंतर्गत नोटीस बजावत घटनेतील प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न झाले. त्यातून शहरात पुन्हा संताप व्यक्त झाला. मदतीला धावून जाणाऱ्या तरुणांनाच नोटिसा बजावून वातावरण तापविले, त्या नोटिसा मागे घ्या अशी मागणी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने केली, तर मतिमंद मुलीवर एका नराधमाने अतिशय घृणास्पद कृत्य केले, तसेच एकंदर प्रकरणातील घटनांच्या निषेधार्त भाजपाचे आज भव्य निषेध मोर्चा निघणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. माधवी नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते व पदाधिकारी उपस्थित राहतील असेही रावकर यांनी सांगितले . 
            
अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार होतो, हि घटना तब्बल आठ दिवस दाबली जाते, राजकारणाचा फटका पीडित कुटुंबाच्या तक्रारीला बसतो. त्यानंतर हे प्रकरण समोर आणणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींची गळचेपी होते. पीडित कुटुंबाला मदतीचा हात देणाऱ्या तरुणांना नोटिसा बजावून त्यांचे मनोधर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होतो, हे सर्वच घटनाक्रम फारच धक्कादायक आहेत, त्यामुळे पीडित मुलीवर एका नराधमाने अतिशय घृणास्पद कृत्य केल्याच्या निषेधार्त, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महिलाओंके सन्मान में, भाजपा मैदान में.. भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे, अशी प्रतिक्रीया भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते यांनी दिली. संबंधीत आरोपीवर ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करावे , तक्रार घेण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांची चौकशी करुन सबंधीतांवर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला मदतीचा हात देणाऱ्या तरुणांना बजावलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, चौकशी जलद आणि निष्पक्ष व्हावी, पीडितेची तक्रार असल्यास दबाव टाकणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणीही करणार असल्याचे  ऍड. मोहिते यांनी अधिक सांगितले. दरम्यान, पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी व विविध मागणीसाठी भाजपा भव्य मोर्चा काढणार असल्याने संबंधित प्रशासन नेमकी काय भूमिका घेतो ? हे समोर येणार आहे  तर  मोर्चात एक सृजन नागरिक म्हणून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *