म्हसळयामध्ये परदेशातून आलेल्या 40 ते 45 नागरिकांवर प्रशासनाची नजर, कोरोनोच्या अफवांमुळे बाजारात मात्र सुकसुकाट

Share Now

1,946 Views

म्हसळा (निकेश कोकचा)  संपूर्ण जगामध्ये कोरोना नावच्या विषाणूने थैमान घातला असून, या रोगाबाबत नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जय्यत तयारी जरी केली असली तरी या रोगाचे रुग्ण म्हसळ्यामध्ये सापडल्याच्या अफवांमुळे बाजारात सुकसुकाट पसरला आहे. म्हसळा तालुक्यात परदेशातून किमान 40 ते 45 स्थानिक नागरिक परतले आहेत.परदेशातून परतणार्‍या या नागरिकांवर प्रशासनाची चोख नजर असून यातील 3 ते 5 जणांना संशयीत म्हणून शासकीय विश्रामगृहातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी व इतर वैदकीय डॉक्टर व कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या अफवांना नागरिक सत्य मानत असून अधिकारीवर्ग या अफवांचा खुलासा करण्यास नकार देत असल्याने कोरोना रोगाच्या बाबतीत म्हसळा तालुक्यात पसरत असलेल्या अफवांची चर्चा थांबणायचा नाव घेत नाही.यामुळे म्हसळा बाजारात नागरिक येण्यास घाबरत असल्याने संपूर्ण बाजारपेठेत सुकसुकाट पसरला आहे.

कोरोना रोगाबाबत म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांची सभा घेऊन कोरोनो रोग थांबवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले. कापरे यांनी शहरातील नागरिकांना कोरोंना रोगापासून सतर्क राहण्यासाठी बॅनर, दवंडी व मेसेजच्या माध्यमातून जनजागृती करून आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले.या आव्हानाला व्यापार्‍यांनीही प्रतिसाद देत गर्दीची संख्या कमी करून प्रशासनाला सहकार्य केले. म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी शहरासहित तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. संपूर्ण जगात कोरोंना विषाणूने थैमान घातला असतानाच म्हसळयामध्ये कोरोंना रुग्ण आढल्याच्या अफवांनी वातावरण तापले आहे.संपूर्ण सरकारी यंत्रणा हा रोग थांबवण्यासाठी प्रयत्न करीत असताना, म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे हे मागील 15 दिवसांपासून सुट्टीवर गेले असून अद्याप परतले नाहीत.यामुळे संपूर्ण तालुक्यातून त्यांचावर टीका होत असून शहरातील नागरिकांना भयानक रोगाच्या सावटावर सोडून जाणारे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उकिर्डे यांच्यावर शासन दरबारी कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *