शिक्षक चळवळीतील सु. बा. मोरे यांच्या रूपाने आधारवड हरपला ;  सुरेश पालकर 

Share Now

497 Views

गोरेगांव (पांडुरंग माने ) रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण क्षेत्रात सुमारे पन्नास वर्षे जिल्हा माध्यमिक शिक्षण संघ, जिल्हा मुख्यध्यापक संघ, राज्य मुख्याध्यपक महामंडळ, विद्यासेवक पतसंस्था जिल्हा रायगड अशा विविध संस्थांच्या माध्यमातून आजपर्यँत कार्यरत असलेले वि. ह. परांजपे विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक व विध्यमान शालेय समितीचे अध्येक्ष कै सुरेश बाबुराव मोरे यांचे काल त्यांच्या मूळगावी दि 17 मार्च रोजी आकस्मित निधन झाले.  वयाच्या 70 व्या वर्षी शिक्षक चळवळीत त्यांचे योगदान अविस्मरणीय होते. वि. ह. परांजपे प्रशालेचे विध्यार्थी ते शिक्षक नंतर मुख्याध्यापक व निवृत्तीनंतर स्थानिकशालेय समितीचे सभापती म्हणून त्यांनी केलेली वाटचाल हि गौरवास्पद आहे. 

कोकण एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष स्वर्गीय ऍड. दत्ता पाटील यांचा मोरे सारांवर असणारा प्रचंड विश्वास व प्रेम यामुळे निवृत्तीनंतर त्यांना सोसायटीचे मुख्यकार्याधिकारी अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली व ती त्यांनी आपल्या अनुभवाच्या व शिस्तप्रिय स्वभावामुळे समर्थपणे पेलली. मितभाषी परंतु शिक्षणक्षेत्रातील कायद्याचा मोठाव्यासंग यामुळे अधिकारी वर्गावर त्यांच्याबद्दल विशेष आदरयुक्त भीती असे. सेवक वर्गाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात ते यशस्वी झाले गरजूना सदैव मदतीचा हात पुढे करणारा हा अवलिया जिल्हाभर सु.बा. मोरे या नावाने परिचित होत वि. ह. परांजपे विद्यामंदिराचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना विद्यामंदिरचा केलेला कायापालट विशेष  स्मरणात राहील जिल्हयाच्या चळवळीमध्ये सदैव अग्रणी असलेल्या मोरे सरांची राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्षप दी झालेली बिनविरोध निवड हा त्यांच्या कार्याचा खरा सन्मान होता.  शिक्षक आमदार स्वर्गीय तात्या सुळे, प्रकाश मोहशीकर, शिवाजीराव पाटील यांच्याशी जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळे त्यांच्याकडून चळवळीचे मिळालेले बाळकडू त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवून संघटनेचे कार्य चालू रहावे हा ध्यास त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जोपासला जिल्यातील सर्व शिक्षक व जेष्ठांकडून मोरे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *