श्रीवर्धन येथील श्रीसाईनाथ बारवर पोलिसांची धाड, दोन लाखाच्या विदेशी दारुसहित तिघांना अटक, आठ दिवसात दुसरी कारवाई

Share Now

671 Views

मुरूड (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील श्रीवर्धन येथे साईनाथ बारच्या बाजूस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड व श्रीवर्धन पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथकाने कारवाई करीत रु.2,09,980/-किमतीच्या विदेशी दारुसहित सुरेश वसंत कावडकर, सुनील विश्वनाथ शेट्टी, महेंद्र शंकर कडू या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई बापूसाहेब शिंदे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात केली आहे. काही दिवसांपूर्वी बोर्ली पंचायतन येथील बार वर छापा टाकीत जवळपास सव्वा पाच लाखाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. याबाबत अधिक तपास श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक उमेश खिरड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *